कोल्हापूर : वर्षभर अल्हाददायक वातावरण, मुबलक पाणी आणि बारमाही हिरवळीने नटलेल्या ऐतिहासिक कोल्हापूरचा रहिवासी व्हायला प्रत्येकजण तयार असतो. कोल्हापुरात स्वत:चे घर असावे, अशी बहुतांश लोकांची इच्छा असते. या इच्छेला मूर्त रूप देणारी संधी `पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो २०२६` ने उपलब्ध करून दिली आहे.
पायाभूत सुविधांच्या वेगवान विकासामुळे पश्चिम महाराष्ट्रातील रिअल इस्टेटचा ‘ब्राईट स्पॉट’ म्हणून कोल्हापूर नावारूपाला आले आहे. दसरा-दिवाळी सणानिमित्त आपल्या हक्काच्या घरासाठी मार्गदर्शन करणाऱ्या भव्य प्रदर्शनाचा प्रारंभ शुक्रवारी असेंब्ली रोडवरील हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसुदन हॉलमध्ये झाला. रामसीना ग्रुप प्रस्तुत `पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो २०२६`चे मुख्य प्रायोजक ‘अनंत इस्टेट डेव्हलपर्स’ व सहप्रायोजक ‘रायसन्स ग्रुप’ आहेत.
प्रदर्शनाचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, दिग्दर्शक महेश लिमये, निर्माते समीर हंप्पी, नाट्य वितरक गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रामसीना ग्रुपचे संचालक विकेश ओसवाल, अनंत इस्टेट डेव्हलपर्सचे संचालक नंदकिशोर पाटील, रायसन्स ग्रुपचे गिरीश रायबागे, गुरुप्रसाद ज्वेलर्सचे दिगंबर इंगवले यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी प्रदर्शनात मांडलेल्या सर्व स्टॉल्सना भेटी देऊन त्यांच्या उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली.
सर्वांचे स्वागत पुढारी पब्लिकेशन प्रा.लि.चे सहायक समूह सरव्यवस्थापक अमित डिक्कर, रिजनल मॅनेजर (मार्केटिंग) शशिकांत पोवार, रिजनल मॅनेजर (स्पेशल इनिशिएटिव्ह) बाळासाहेब नागरगोजे, सिनिअर इव्हेंट मॅनेजर राहुल शिंगणापूरकर, `टोमॅटो`चे रिजनल मॅनेजर मयूर तांबेकर, इव्हेंट मॅनेजर सनी गावडे यांनी केले.
अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी साधला संवाद
उद्घाटन समारंभास उपस्थित अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी स्टॉलधारक व ग्राहकांशी आवर्जून संवाद साधला. ते म्हणाले, प्रदर्शनात एक-दोन-तीन नव्हे, तर तब्बल चार फ्लॅट बुक केले आहेत. एक फ्लॅट कोल्हापूरकरांच्या मनात, दुसरा दै. ‘पुढारी’च्या मनात, तिसरा `प्रॉपर्टी एक्स्पो २०२६`, तर चौथा थिएटरमध्ये बुक केला आहे, जेथे १२ नोव्हेंबरपासून ‘आदि अनंत’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. आपल्या या चित्रपटालाही कलाप्रेमी कोल्हापूरकरांनी पाठबळ द्यावे, असेे आवाहन संकर्षण यांनी केले.
सुलभ गृहकर्ज व थेट स्पॉट बुकिंग ऑफर्स
दसरा-दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नामांकित बँका व वित्तीय संस्थांकडून सुलभ गृह कर्ज, कमी व्याजदर आणि मंजुरीचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच सणासुदीच्या डिस्काऊंट्स व स्पॉट बुकिंग ऑफर्सची बरसात असणार आहे.
एका छताखाली विविध पर्याय
प्रदर्शनात सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांच्या बजेटमधील १ व २ बीएचकेपासून ते उच्चभ्रू जीवनशैलीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या लक्झरी ३ व ४ बीएचके फ्लॅट्स, प्लॉट्स, घरे, व्यावसायिक गाळे असे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहकांचा वेळ, श्रम वाचणार आहे.
विकसित शहरात गुंतवणुकीची सुवर्णसंधी
विविधतेने नटलेल्या कोल्हापूर शहराचा चौफेर विकास सुरू आहे. अशा शहरात गुंतवणुकीची सुवर्णसंधी प्रदर्शनातून मिळणार आहे.
प्रदर्शनाची वेळ व ठिकाण
दिनांक : शनिवार, दि. १७ आणि रविवार, दि. १८
वेळ : सकाळी १० ते रात्री ८. ठिकाण : मधुसुदन हॉल, हॉटेल पॅव्हेलियन, असेंब्ली रोड, कोल्हापूर. अधिक माहितीसाठी संपर्क :
आनंद : ९८५०९९११८६, अतुल : ९८२२४०८४३३