Pudhari Property Expo 2026 | ‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ची उत्सुकता वाढली, उद्यापासून तीन दिवस चालणार गृहोत्सव

कोल्हापूर रिअल इस्टेट ‘टेकऑफ’च्या उंबरठ्यावर; प्रदर्शनात घरांचे असंख्य पर्याय आणि आकर्षक फेस्टिव्हल ऑफर्सची रेलचेल
Pudhari Property Expo 2026 |
Pudhari Property Expo 2026 | ‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ची उत्सुकता वाढली, उद्यापासून तीन दिवस चालणार गृहोत्सव
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले कोल्हापूर शहर आता पायाभूत सुविधांच्या वेगवान विकासाच्या बळावर पश्चिम महाराष्ट्रातील रिअल इस्टेटचा सर्वात मोठा ‘ब्राइट स्पॉट’ म्हणून झपाट्याने पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर, दसरा-दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करू पाहणाऱ्यांसाठी दै. ‘पुढारी’ आयोजित आणि रामसीना ग्रुप प्रस्तुत तीनदिवसीय ‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ उद्या, शुक्रवार (दि. १६ ऑक्टोबर) पासून सुरू होत आहे. अनंत इस्टेट डेव्हलपर्स या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून, रायसन्स ग्रुपसह प्रायोजक आहेत.

असेंब्ली रोडवरील हॉटेल पॅव्हेलियन येथील मधुसूदन हॉलमध्ये हे भव्य प्रदर्शन रंगणार असून, रिअल इस्टेट क्षेत्रासाठी हा एक्स्पो नवा ‘टर्निंग पॉइंट’ ठरेल. ‘रामसीना ग्रुप’ प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत.

शहराचा सर्वांगीण विकास व गुंतवणुकीची सुवर्णसंधी

हायकोर्ट सर्किट बेंच, १,१०० खाटांचे अत्याधुनिक सुपरस्पेशालिटी रुग्णालय, भव्य कन्व्हेन्शन सेंटर आणि जोतिबा, नृसिंहवाडी, खिद्रापूर यांसारख्या प्रसिद्ध धार्मिक पर्यटन केंद्रांचा झालेला कायापालट यामुळे शहराची

वाटचाल अभूतपूर्व आर्थिक व नागरी ‘टेकऑफ’च्या दिशेने सुरू झाली आहे. सर्किट बेंचमुळे लगतच्या सहा जिल्ह्यांतून विधिज्ञ, व्यावसायिक व नागरिकांची शहरात मोठी ये-जा वाढली

असून, अनेकांनी कायमस्वरूपी स्थलांतर केले आहे. परिणामी, निवासी घरांसह भाडेतत्त्वावरील जागांची मागणी प्रचंड वाढली आहे.

सध्या कोल्हापुरात १.५ ते ४ टक्क्यांपर्यंत खात्रीशीर रेंटल यील्ड मिळत असून, मालमत्तांचे दर वार्षिक १२ ते १५ टक्क्यांच्या वेगाने वाढत आहेत. त्यामुळे सुरक्षित भविष्य आणि उत्तम भांडवली परताव्यासाठी हीच खरेदीची सर्वोत्तम वेळ मानली जात आहे. सुलभ गृहकर्ज व फेस्टिव्हल ऑफर्स दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर नामांकित बँका व वित्तीय संस्थांकडून सुलभ गृहकर्ज, कमी व्याजदर आणि मंजुरीचे मार्गदर्शन जागेवरच दिले जाईल. तसेच बांधकाम व्यावसायिकांकडून विशेष फेस्टिव्हल डिस्काउंट्स व थेट स्पॉट बुकिंग ऑफर्स दिल्या जाणार असल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

एकाच छताखाली सर्वसामान्यापासून लक्झरी घरांपर्यंतचे पर्याय

प्रदर्शनात सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांच्या बजेटमधील १ व २ बीएचके घरांपासून ते उच्चभ्रू जीवनशैलीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या लक्झरी ३ व ४ बीएचके फ्लॅट्स, स्वतंत्र रो-हाऊस, प्रीमियम व्हिला, उपनगरांतील एनए प्लॉट्स आणि मोक्याच्या ठिकाणच्या व्यावसायिक गाळ्यांचे शेकडो पर्याय उपलब्ध असणार आहेत. सर्व प्रकल्पांची तुलना एकाच छताखाली करण्याची संधी मिळत असल्याने ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.

प्रदर्शनाची वेळ व ठिकाण

दिनांक : १६, १७ आणि

१८ ऑक्टोबर २०२६

(उद्यापासून सुरू)

ठिकाणी : मधुसूदन हॉल, हॉटेल पॅव्हेलियन, असेंब्ली रोड, कोल्हापूर

अधिक माहितीसाठी संपर्क :

आनंद : ९८५०९९११८६

अतुल : ९८२२४०८४३३

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news