

कोल्हापूर ः कोल्हापुरातील गृह खरेदीदारांसाठी घरांचे, फ्लॅटस्चे असंख्य पर्याय आणि भरघोस सवलतीच्या ऑफर्स एकाच छताखाली उपलब्ध करून देणार्या दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रस्तुत आणि सिद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सहप्रस्तुत ‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो 2025’ येत्या 8, 9 आणि 10 मार्च रोजी होत आहे. गायकवाड इन्फ्रास्ट्रक्चर आणि अविष्कार इन्फ्रा हे या प्रदर्शनाचे सहयोगी प्रायोजक आहेत. हा एक्स्पो आर. व्ही. ओपन ग्राऊंड, राजहंस प्रिंटिंग प्रेससमोर, नागाळा पार्क, बावडा रोड येथे होणार आहे.
या प्रदर्शनात फ्लॅटस्, प्लॉटस्, रो हाऊसेस, बंगलो आणि पेंटहाऊस यासह बजेट आणि लक्झरी घरांचे शेकडो पर्याय उपलब्ध असतील. बांधकाम क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, अद्ययावत गृहप्रकल्प, बांधकाम साहित्य आणि आधुनिक सुविधांनी युक्त संकल्पना यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी येथे मिळणार आहे. या प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये ग्राहकांसाठी स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी असंख्य पर्याय उपलब्ध असतील. स्वस्त आणि परवडणार्या गृहप्रकल्पांपासून ते लक्झरी बंगल्यांपर्यंत सर्व श्रेणींतील प्रॉपर्टी येथे पाहायला मिळतील. स्वतंत्र बंगलो, रो हाऊसेस, अपार्टमेंटस्, प्लॉटस् आणि पेंटहाऊस यासह ग्राहकांच्या वेगवेगळ्या बजेटनुसार विविध पर्याय उपलब्ध असतील. कोल्हापूरच्या वेगाने विकसित होणार्या परिसरामध्ये आधुनिक सोयींनी युक्त गृहप्रकल्पांची माहिती घेण्याची आणि थेट बुकिंगसाठी भरघोस सवलतींचा लाभ घेण्याची संधी या प्रदर्शनात मिळणार आहे.
विशेष म्हणजे, स्पॉट बुकिंग करणार्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स आणि डिस्काऊंटस् उपलब्ध असतील. गृह खरेदीदारांसाठी खास फायनान्स योजनांचा लाभही मिळू शकतो. कोल्हापुरातील रिअल इस्टेटमध्ये सध्या वाढती मागणी असलेल्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या संधी, गृहबांधणीतील आधुनिक ट्रेंडस् आणि सर्वोत्तम प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली पाहण्याची ही सुवर्णसंधी असेल. घर घेण्याचा विचार करत असाल, तर या प्रदर्शनाला नक्की भेट द्या आणि तुमच्या स्वप्नातील घराचा शोध घ्या!
आर. व्ही. ओपन ग्राऊंड, राजहंस प्रिंटिंग प्रेससमोर, नागाळा पार्क, बावडा रोड, कोल्हापूर.
दिनांक ः 8, 9 आणि 10 मार्च
अधिक माहितीसाठी संपर्क :
बाळासाहेब : 9850556009
आनंद : 9850991186