

कोल्हापूर : कोल्हापुरात दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘पुढारी प्रॉपर्टी अँड ऑटो एक्स्पो 2025’ला कोल्हापूरकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ग्राहकांना एकाच छताखाली घर, कार आणि दुचाकींचे विविध पर्याय निवडण्याची संधी मिळाल्याने प्रदर्शनाचा सोमवारी गर्दीतच समारोप झाला. या एक्स्पोमध्ये अनेक बांधकाम व्यावसायिकांकडे फ्लॅटस्चे बुकिंग झाले. तर अनेक ग्राहकांनी डिलर्सकडे दुचाकी आणि चारचाकी गाड्या खरेदीचा निर्णय घेतला.
‘साई डेव्हलपर्स अँड बिल्डर्स’ हे या एक्स्पोचे असोसिएट स्पॉन्सर होते. तर को-स्पॉन्सर म्हणून घाटगे डेव्हलपमेंटस् सहभागी झाले होते. या प्रदर्शनात कोल्हापूर शहरातील नामवंत बांधकाम व्यावसायिकांचे फ्लॅटस्, बंगलो, रो हाऊसेस प्रकल्प तसेच विविध ऑटोमोबाईल कंपन्यांचे कार आणि दुचाकीचे लेटेस्ट मॉडेल्स एकाच ठिकाणी उपलब्ध होते. या आकर्षक गर्दीमुळे अनेक फ्लॅट्चे ऑन-द-स्पॉट बुकिंग झाले, तसेच अनेक गाड्यांचीही खरेदी झाली.
जीएसटी 2.0 मुळे वाहनांच्या किमतीत मोठी घट झाली आहे. कारवर 2 लाख रुपयांपर्यंत, तर दुचाकींवर 8 ते 12 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळत असल्याचा थेट फायदा ग्राहकांना झाला. दसरा आणि दिवाळीच्या ऑफर्समुळे ऑन-द-स्पॉट बुकिंगवरही आकर्षक सवलती मिळाल्या, ज्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. साई डेव्हलपर्स अँड बिल्डर्स आणि घाटगे डेव्हलपमेंटस् यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन यशस्वी झाले. एकूणच, कोल्हापूरकरांनी आपल्या स्वप्नातील घर आणि गाडी खरेदी करण्याची संधी साधत या एक्स्पोची यशस्वी सांगता झाली.