

कोल्हापूर : कोल्हापूरकरांना स्वप्नातलं घर आणि ड्रीम कार खरेदी करण्याची संधी एकाच छताखाली देणार्या ‘पुढारी प्रॉपर्टी अँड ऑटो एक्स्पो 2025’ या भव्य प्रदर्शनाचा शुभारंभ शनिवार, दि. 20 रोजी नागाळा पार्कातील आर. व्ही. आऊटडोअर ओपन ग्राऊंड येथे होत आहे. ‘पुढारी’ माध्यम समूहातर्फे आयोजित हे प्रदर्शन तीन दिवस म्हणजे सोमवार (दि. 22) पर्यंत चालणार आहे.
या एक्स्पोचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून के्रडाईचे अध्यक्ष के. पी. खोत, साई डेव्हलपर्स अँड बिल्डर्सचे संचालक सुमित प्रकाश मेडशिंगे, घाटगे डेव्हलपमेंटस्चे वीरेंद्रसिंह घाटगे उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनाचे असोसिएट स्पॉन्सर साई डेव्हलपर्स अँड बिल्डर्स आहेत, तर को-स्पॉन्सर म्हणून घाटगे डेव्हलपमेंटस् सहभागी झाले आहेत. हे प्रदर्शन घर आणि वाहन खरेदीदारांसाठी एक मोठी संधी आहे.
प्रदर्शनात कोल्हापूर शहर आणि परिसरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे विविध प्रकल्प एकाच ठिकाणी पाहता येतील. तसेच बाजारात नव्याने आलेल्या आणि ट्रेंडमध्ये असलेल्या ऑटोमोबाईल कंपन्यांच्या लेटेस्ट मॉडेल्सचा अनुभव घेता येणार आहे. एकाच ठिकाणी अनेक कंपन्यांची वाहने उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांना विविध ठिकाणी वणवण करावी लागणार नाही. ग्राहकांना आपल्या बजेटनुसार अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे त्यांच्या खरेदीचा निर्णय सोपा होईल. या प्रदर्शनामुळे बांधकाम व्यावसायिक आणि ऑटोमोबाईल डिलर्सना त्यांच्या उत्पादनांची हजारो संभाव्य ग्राहकांपर्यंत ओळख करून देण्याची उत्तम संधी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी आनंद (9850991186) यांच्याशी संपर्क साधावा.
सर्वात नवीन आणि आधुनिक मॉडेल्स, इलेक्ट्रिक गाड्यांपासून ते एसयूव्हीपर्यंत, सर्व प्रकारचे पर्याय एकाच ठिकाणी पाहता येतील. साईड-बाय-साईड तुलना, टेस्ट ड्राईव्हची संधी मिळणार आहे. जीएसटी 2ः0 मुळे वाहनांच्या करात कपात झाली आहे. त्यामुळे त्याचा ग्राहकांना थेट फायदा होत आहे. याचा लाभ घेता येईल. शिवाय दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वितरकांनी स्पॉट बुकिंगवर आकर्षक सवलतीच्या ऑफर्स जाहीर केल्या आहेत.
फ्लॅट, प्लॉट आणि बंगलोंचे विविध पर्याय, रो-हाऊस आणि फार्महाऊस प्लॉट, आधुनिक जीवनशैली, गृहनिर्माण क्षेत्रातील नवीन ट्रेंडस्, रचना आणि डिझाईनची माहिती याठिकाणी मिळणार आहे. शिवाय विविध बँकांच्या आणि वित्तीय संस्थांच्या कर्ज सुविधा याच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.