Pudhari AI Workshop : ‘पुढारी‌’चे नवी दिशा देणारे AI वर्कशॉप

मोबाईल वापरता येणाऱ्या प्रत्येकासाठी ‌‘एआय‌’ शिकण्याची सुवर्णसंधी
Pudhari AI Workshop
‘पुढारी‌’चे नवी दिशा देणारे AI वर्कशॉप
Published on
Updated on

कोल्हापूर : डिजिटल युगात ‌‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स‌’ (AI) चे महत्त्व झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, दै. ‌‘पुढारी‌’आणि ‌‘सिंक एआय‌’ यांच्या संयुक्त विद्यमाने Introduction to AI आणि ‘Prompt Engineering’ या एकदिवसीय विशेष कार्यशाळेचे चार शहरांत आयोजन करण्यात आले आहे.

प्रसिद्ध ‌‘एआय‌’ सल्लागार डॉ. अमेय पांगारकर आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग तज्ज्ञ प्रसाद कुलकर्णी यामध्ये सोप्या भाषेत मार्गदर्शन करणार असून, 25 हून अधिक एआय टूल्सचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्मार्ट फोन वापरणाऱ्या कुणालाही या कार्यशाळेत सहभागी होऊन ‌‘एआय‌’ शिकता येणार आहे.

कार्यशाळेत काय शिकवणार?

प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग : ‌‘एआय‌’कडून नेमके काम करून घेण्याची कला.

कंटेंट क्रिएशन : वेबसाईट, व्हिडीओनिर्मिती, प्रेझेंटेशन आणि सोशल मीडिया कंटेंट तयार करणे.

व्यावसायिक वापर : शिक्षण, व्यवसाय आणि दैनंदिन जीवनातील ‌‘एआय‌’चा प्रभावी वापर.

सायबर सिक्युरिटी : ‌‘एआय‌’ वापरताना घ्यायची काळजी आणि सुरक्षा.

कार्यशाळेचे वेळापत्रक, ठिकाण

वेळ सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 अशी असेल.

7 मे कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स ((DRK)), लक्ष्मीपुरी.

8 मे सांगली : गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स (GACC), सांगली-मिरज रोड.

9 मे कराड : लिगाडे पाटील कॉलेज ऑफ सायन्स, विद्यानगर, सैदापूर.

10 मे सातारा : कला व वाणिज्य महाविद्यालय, शुक्रवार पेठ.

‌‘या‌’ कार्यशाळेची वैशिष्ट्ये

  • इंग््राजीबरोबर मराठीतून परिपूर्ण मार्गदर्शन

  • प्रत्येकाला समजेल अशी सोपी भाषा

  • सहभागाचे सर्टिफिकेट मिळणार

  • मार्गदर्शक पुस्तक मोफत मिळणार

कोणाला सहभागी होता येईल?

  • विद्यार्थी : अभ्यासात आणि करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी

  • गृहिणी : घरबसल्या नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी

  • नोकरदार व वर्किंग वूमन : ऑफिसचे काम सोपे आणि जलद करण्यासाठी

  • आजी-आजोबा : नवीन काळातील तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news