

कोल्हापूर : नवीन शैक्षणिक वर्ष आज (सोमवार)पासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर दै.‘पुढारी’च्या वतीने ‘पायपीट’ उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये चालत येणार्या विद्यार्थ्यांचे शालेय उपयोगी भेटवस्तू व शुभेच्छापत्र देऊन अनोख्या पद्धतीने स्वागत केले जाणार असल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत होणार आहे.
उन्हाळी सुट्टीनंतर सोमवार, दि. 16 जून रोजी 2025-26 चे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. जिल्ह्यात आजही दुर्गम वाड्यांवर शाळांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना कित्येक किलोमीटर पायी चालत शाळेला जावे लागते. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने दै. ‘पुढारी’ने हा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी अभिषेक दिलीप शहा व डॉ. नेहा अभिषेक शहा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 16 जून रोजी शाळेचा पहिला दिवस आहे. या निमित्त जिल्ह्यातील काही निवडक शाळांमध्ये पायपीट करत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ होणार आहे.
विद्यामंदिर हणबरवाडी (ता. कागल) येथे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत तसेच विद्यामंदिर दूधगंगानगर-काळम्मावाडी (ता. राधानगरी) येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर या प्रमुख उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणार आहेत.
विद्यामंदिर बोळावी (ता. कागल)
विद्यामंदिर हणबरवाडी (ता. कागल)
विद्यामंदिर वासनोली (ता. भुदरगड)
विद्यामंदिर मिणचे बुद्रुक (ता. भुदरगड)
केंद्रीय प्राथ. शाळा गवसे (ता. आजरा)
विद्यामंदिर गवशी गावठाण (ता. राधानगरी)
विद्यामंदिर उपवडे (ता. करवीर)
विद्यामंदिर बिजूर (ता. चंदगड)
विद्यामंदिर चन्नेकुप्पी (ता. गडहिंग्लज)
विद्यामंदिर असंडोली (ता. गगनबावडा)
विद्यामंदिर खापणेवाडी (ता. पन्हाळा)
आदर्श माध्यमिक वि. गजापूर (ता. शाहूवाडी)
विद्यामंदिर दूधगंगानगर, (काळम्मावाडी, ता. राधानगरी)