Pudhari Natya Utsav : कोल्हापूर, सांगलीत ‘पुढारी’ नाट्योत्सव

‘नियम व अटी लागू’ आणि ‘आमने-सामने’ या सुपरहिट नाटकांचे खास प्रयोग
Pudhari Natya Utsav
कोल्हापूर, सांगलीत ‘पुढारी’ नाट्योत्सव
Published on
Updated on

कोल्हापूर : दैनिक ‘पुढारी’च्यावतीने नाट्यरसिकांसाठी एक खास सांस्कृतिक मेजवानी ठरणार्‍या ‘नाट्योत्सवा’चे आयोजन ऑक्टोबरमध्ये करण्यात आले आहे. मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ व जव्हेरी हे या नाट्योत्सवाचे मुख्य प्रायोजक आहेत. मिरज आणि कोल्हापूर येथे सलग तीन दिवसात मराठी रंगभूमीवर सध्या गाजत असलेल्या ‘नियम व अटी लागू’ आणि ‘आमने-सामने’ या नाटकांचे प्रयोग रसिकांच्या भेटीला येणार आहेत.

आजची जीवनशैली, नातेसंबंध आणि पिढ्यांमधील अंतर यांसारख्या विषयांवर खुसखुशीत भाष्य करणार्‍या या नाटकांचे प्रयोग दिवाळीपूर्वी रसिकांना एक वेगळी वैचारिक सांस्कृतिक अनुभूती देणार आहेत.

‘नियम व अटी लागू’ : आजच्या पिढीचे खुसखुशीत नाटक

चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि संकर्षण कर्‍हाडे लिखित हे नाटक आजच्या तरुणाईच्या जीवनावर आधारित आहे. पती-पत्नीच्या नात्यातील बदलत्या अपेक्षा आणि त्यांना लागू केलेले ‘नियम व अटी’ पाळताना होणारी विनोदी कसरत यात पाहायला मिळते. संकर्षण कर्‍हाडे आणि अमृता देशमुख यांची भूमिका असलेले हे नाटक प्रेक्षकांना भरपूर हसवते आणि विचार करायलाही लावते.

‘आमने-सामने’ : हास्य आणि विचारांची जुगलबंदी

दिग्दर्शक नीरज शिरवईकर यांच्या दिग्दर्शनाखालील हे नाटक कुटुंबातील दोन पिढ्यांच्या विचारांतील अंतर आणि लग्नसंस्थेवर आधारित आहे. ज्येष्ठ अभिनेते मंगेश कदम आणि लीना भागवत यांच्या अभिनयाची जुगलबंदी या नाटकाचे मुख्य आकर्षण आहे. पिढीनुसार बदलणार्‍या नात्यांचे आयाम अत्यंत रंजक पद्धतीने यात मांडले आहेत. दोन्ही शहरातील नाट्यप्रेमींना, मराठी रंगभूमीच्या या लोकप्रिय कलाकृतींचा कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत आनंद घेण्यासाठी नाट्यगृहात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दै. ‘पुढारी’च्यावतीने करण्यात आले आहे. याचबरोबर या नाट्योत्सवाची तिकिटे book my show आणि तिकिटालय यावर ऑनलाईन उपलब्ध आहेत.

फोनवरून तिकीट बुकिंगसाठी संपर्क : मिरज : 9420791620, कोल्हापूर : 9561626663.

प्रयोगांचे वेळापत्रक...

मिरज : बालगंधर्व नाट्यमंदिर

दिनांक नाटक

6 ऑक्टोबर : नियम व अटी लागू

7 ऑक्टोबर : आमने सामने

कोल्हापूर : आनंद भवन, सायबर कॉलेज हॉल

दिनांक नाटक

7 ऑक्टोबर : नियम व अटी लागू

8 ऑक्टोबर : आमने सामने

सर्व प्रयोग सायंकाळी 7 वाजता सुरू होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news