

कोल्हापूर : ‘पुढारी’ माध्यम समूह परिवाराकडून गणपती विसर्जन मिरवणुकीतील सहभागी मंडळांचे शुक्रवारी स्वागत करण्यात आले. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा व्यासपीठावर बोलावून पान-सुपारी आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ‘पुढारी’ माध्यम समूह आणि मान्यवरांच्या सहकार्याने मंडळाचे कार्यकर्ते, मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या भाविक, नागरिकांना पिण्याचे पाणी, चिक्की, भडंग आणि फ्लेवर्ड मिल्कचे वाटप करण्यात आले.
दैनिक ‘पुढारी’, ‘पुढारी न्यूज’, टोमॅटो एफएम, पुढारी डिजिटल या ‘पुढारी’ माध्यम समूह आणि कोल्हापूरकर यांचे अतुट नाते आहे. दरवर्षी विसर्जन मिरवणुकीतील सहभागी मंडळांचे ‘पुढारी’ परिवाराकडून जल्लोपी स्वागत केले जाते. यावर्षीही महाद्वार रोडवर गुजरी कॉर्नर येथे उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षात मंडळांचे स्वागत केले जात होते.‘पुढारी’ माध्यम समूहाच्या वतीने मंडळांचे कार्यकर्ते, मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या भाविक, नागरिकांना पिण्याचे पाणी, चिक्की, भडंग आणि फ्लेवर्ड मिल्कचे वाटप करण्यात आले. गर्दीत पिण्याचे पाणी, चिक्की, भडंग, फ्लेवर्ड मिल्क मिळाल्याने भाविकांना तसेच मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान दिसत होते. अनेकजण या उपक्रमाबद्दल सहकार्य करणाऱ्या मान्यवरांसह ‘पुढारी’ परिवाराला धन्यवाद देत होते.
यांचे लाभले सहकार्य
कशिश ग्रुपतर्फे रमेश लालवाणी आणि सागर लालवाणी यांच्या सहकार्याने भाविकांना ऑक्सिरिच पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. बासुंदी, श्रीखंड, पनीर आणि फ्लेवर्ड मिल्क यांसारखी दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध असलेल्या श्री. मेहता यांच्या भारत डेअरीकडून फ्लेवर्ड मिल्कचे वाटप करण्यात आले. कोल्हापूरमधील वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी क्षेत्रातील विश्वासाचे नाव असलेल्या अग्रवाल वन ग्रॅम गोल्ड यांच्या वतीने तसेच प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण हेंद्रे व डॉ. ओंकार हेंद्रे यांच्या रंगनाथ हॉस्पिटल आणि गोकुळ आयव्हीएफ यांच्या वतीने भाविकांना चिक्की पाकिटांचे वाटप करण्यात आले. चकोते ग्रुप नांदणीचे अण्णासाहेब चकोते यांच्या वतीने भाविकांना भडंग, सोनपापडी, शाबूचिवडा पाकिटांचे वाटप करण्यात आले. कोल्हापुरातील बिंदू चौक येथील प्रसिद्ध माधुरी बेकरी, फरसाण अँड स्वीट यांच्या वतीनेही भडंग पाकिटांचे वाटप करण्यात आले.