

कोल्हापूर : खरेदीची रंगतदार मेजवानी, स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद आणि धमाल मनोरंजनासाठी खवय्ये आणि खरेदीप्रेमींसाठी पर्वणी ठरणारा ‘पुढारी कोल्हापूर कार्निव्हल 2024’ यंदा धूमधडाक्यात साजरा होणार आहे. 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत मेरी वेदर ग्राऊंड, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे हा भव्य कार्निव्हल होणार असून सध्या तयारी अंतिम टप्प्यात आहे.
कार्निव्हलमध्ये 130 हून अधिक स्टॉल्सच्या माध्यमातून चारचाकी वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स, होम डेकोर, गारमेंट्स, फर्निचर, सौंदर्य प्रसाधने, किचन ट्रॉली, मसाले, लोणची, ज्वेलरी, बॅग्ज आणि प्लास्टिक वस्तूंसह विविध प्रकारचे प्रॉडक्टस् उपलब्ध होणार आहेत. चारचाकी, दोन चाकी, ई-वाहने आदी ऑटोमोबाईल विभागाचे स्वतंत्र दालन असणार असून सहभागी सर्व वाहनांची माहिती, टेस्ट ड्राइव्ह प्रदर्शनात मिळणार असून स्पॉट बुकिंगवर भरघोस सूट आणि आकर्षक ऑफर्स वाहन कंपन्यांमार्फत देण्यात येणार आहेत. कोल्हापुरातील उदंड प्रतिसादाचे एकमेव प्रदर्शन असल्यामुळे विक्रेते, व्यावसायिकांच्या व्यवसायाला नवी दिशा मिळणार आहे.
‘पुढारी कोल्हापूर कार्निव्हल 2024’ मध्ये खवय्यांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची रेलचेल असलेली मेजवानी मिळणार आहे. दररोज सायंकाळी, कराओके, लाईव्ह ऑर्केस्ट्रा, डीजे नाईट अशा धमाकेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोबत आबालवृद्धांना सहकुटुंब अम्युझमेंट पार्कची धमाल अनुभवता येणार आहे. आकर्षक रोषणाई आणि नावीन्यपूर्ण कार्निव्हल थीममध्ये प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याने कोल्हापूरकरांसाठी आकर्षणाचा विषय ठरणार आहे.
‘पुढारी कोल्हापूर कार्निव्हल 2024’ हा खरेदी, खाद्यपदार्थ आणि धमाल यांचा संगम आहे. खरेदीची रंगत, स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी आणि धमाल मनोरंजनाचा अनुभव घेण्यासाठी या महोत्सवात सहभागी होऊन नववर्ष स्वागताचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
फूड स्टॉल बुकिंगसाठी संपर्क : 8805007724, 9423824997, 9923617769,
कंझ्युमर स्टॉल बुकिंगसाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क ः 9834433274, 9404077990, 9922930180
स्थळ : मेरी वेदर ग्राऊंड, नागाळा पार्क, कोल्हापूर
दिनांक : 26 ते 30 डिसेंबर