

कोल्हापूर ः कोल्हापूरवासीयांसाठी आनंदाची पर्वणी ठरणारा ‘पुढारी कोल्हापूर कार्निव्हल 2024’चा प्रारंभ गुरुवारी (दि. 26) होणार आहे. या महोत्सवासाठी मेरी वेदर ग्राऊंड, नागाळा पार्क येथे भव्य मंडप उभारण्यात आला आहे. या वर्षीच्या ‘शॉपिंग आणि फूड फेस्टिव्हल’ कार्निव्हल स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये रंगीबेरंगी मुखवटे, मनमोहक रोषणाई आणि आकर्षक सजावट यामुळे हा कार्निव्हल कोल्हापूरकरांसाठी अविस्मरणीय भेट ठरणार आहे. ‘सन मराठी’ हे कार्यक्रमाचे एंटरटेन्मेंट पार्टनर असून हेल्थ पार्टनर तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र आणि सहप्रायोजक रॉनिक स्मार्ट, आईस्क्रीम पार्टनर क्रेझी आईस्क्रीम आहेत.
26 ते 30 डिसेंबर या कालावधीत होणार्या या कार्निव्हलमध्ये खरेदी, खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाचा संगम अनुभवता येणार आहे. कार्निव्हलमध्ये 130 हून अधिक स्टॉल्स असून त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, गारमेंटस्, फर्निचर, किचन वेअर, दागिने, सौंदर्य प्रसाधने यासारख्या विविध ग्राहकोपयागी वस्तू उपलब्ध आहेत. याशिवाय चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र विभाग असून ग्राहकांना टेस्ट ड्राईव्हची सोय तसेच स्पॉट बुकिंगवर विशेष ऑफर्स देण्यात येणार आहेत.कार्निव्हलमध्ये खवय्यांसाठी चविष्ट खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. कोल्हापुरी तांबडा-पांढरा, मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थ, चौपाटीवरील खास स्ट्रीट फूड, फास्टफूड प्रकार आणि पारंपरिक स्वाद यांचा आस्वाद घेण्याची उत्तम संधी मिळणार आहे.
मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये रोज सायंकाळी कराओके, लाईव्ह ऑर्केस्ट्रा आणि डीजे नाईटची धमाल असणार आहे. लहान मुलांसाठी खास अम्युझमेंट पार्क आणि विविध खेळांच्या सुविधा उपलब्ध असतील, ज्यामुळे हा उत्सव संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाची पर्वणी ठरेल यात शंका नाही. नववर्ष स्वागताच्या दरम्यान साजरा होणारा हा कार्निव्हल ग्राहकांना नववर्ष साजरे करण्याची उत्तम संधी घेऊन आला आहे. ‘पुढारी कोल्हापूर कार्निव्हल 2024’ या खरेदीच्या उत्सवात चविष्ट खाद्यपदार्थ, आणि धमाकेदार मनोरंजनाचा अनुभव घेण्यासाठी आपल्या कुटुंबासह या कार्निव्हलला उपस्थित राहा आणि या खरेदी उत्सवाचा आनंद घ्या, असे आवाहन दै. ‘पुढारी’च्या वतीने करण्यात येत आहे.
मोजकेच स्टॉल शिल्लक, कंझ्युमर स्टॉल बुकिंग व अधिक माहितीसाठी : 9922930180, 9404077990, 9834433274
फूड स्टॉल बुकिंगसाठी संपर्क : 8805007724, 9423824997, 9923617769.