

कोल्हापूर : दसरा आणि दिवाळीचा आनंद उत्सव एकत्र साजरा करणारा, महिलांच्या सर्जनशीलतेला आणि सांस्कृतिक उत्साहाला वाव देणारा भव्य ‘रास दांडिया आणि दिवाळी पार्टी 2025’ कार्यक्रम दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे आयोजित करण्यात आली आहे.
बुधवार, दि. 15 रोजी दुपारी 4 ते 7 या वेळेत हॉटेल अल्बा, मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे हा सांगीतिक सोहळा संपन्न होणार आहे. टोमॅटो एफ.एम.वरील लोकप्रिय शो ‘डिस्को में खिसको’चे होस्ट डीजे बीटस् (धीरज माळी). डीजे बीटस् त्यांच्या बॉलीवूड, हिप-हॉप आणि रेट्रो बीटस्च्या धमाकेदार संगीताने कोल्हापूरच्या रसिकांना थिरकवणार आहेत. माळी यांना आऊटस्टँडिंग डीजे रेट्रो ॲवॉर्डसाठी नामांकन मिळालेले असून, या क्षेत्रात 20 वर्षांचा अनुभव आहे. डीजे धीरज माळी दांडियाच्या तालावर एक अविस्मरणीय संध्याकाळ सादर करणार आहेत.
‘छेल छोगाडा’ गरबा क्लासच्या संयोजिका पुष्टी दावडा या उत्कृष्ट सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला रंगत आणतील, तसेच उपस्थितांना दांडिया नृत्याच्या खास स्टेप्सही शिकवणार आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक रंगनाथ हॉस्पिटलचे गोकुळ आयव्हीएफ सेंटर आहे. व्हेन्यू पार्टनर हॉटेल अल्बा, तर गिफ्ट पार्टनर तनिष फॉर्मिंग ज्वेलरी आहेत.
कोल्हापूरच्या मार्केट यार्ड भागात वसलेले हॉटेल अल्बा प्रीमियर कोल्हापूर हे लक्झरी आणि आदरातिथ्याचे उत्तम उदाहरण आहे. येथे फायर अँड स्मोक रेस्टॉरंट आणि निवांत क्षणांसाठी फ्लेम बार आणि लाँज उपलब्ध आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम, कॉर्पोरेट इव्हेंट यासाठी प्रशस्त बॅन्क्वेट हॉल व लॉन, तसेच अलिशान खोल्या, उत्कृष्ट सेवा उपलब्ध आहेत. अर्जुन शहाजी कदम यांनी राजारामपुरी सहावी गल्ली येथे नव्याने सुरू केलेल्या तनिष फार्मिंग ज्वेलरी या शोरूममध्ये 1 व 2 ग्रॅम सोन्यामध्ये असंख्य दागिन्यांची व्हरायटी पाहायला मिळेल. यामध्ये लाँग नेकलेस, शॉर्ट नेकलेस, गंठण, साज, ठुशी, मोत्यांचे दागिने, असे असंख्य नमुने उपलब्ध आहेत. यापूर्वी त्यांच्या कराड व सातारा येथे दोन शाखा सुरू आहेत. कोल्हापुरातील राजारामपुरी येथील शाखेस सर्वांनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन अर्जुन कदम यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे सहायक प्रायोजक आहेत रंगनाथ हॉस्पिटल. या हॉस्पिटलची धुरा आता हेंद्रे परिवारातील दुसरी पिढी डॉ. ओंकार हेंद्रे आणि डॉ. स्नेहल हेंद्रे हे सांभाळत आहेत. नैसर्गिक प्रसूती, लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया आणि वंध्यत्व निवारण (खतऋ) मध्ये विशेष अनुभव असलेल्या या डॉक्टरांचे मार्गदर्शन रुग्णांना मिळणार आहे. हॉस्पिटलमध्ये ‘इंदुमती सर्वांगीण बाळंतपण योजना’ सुरू असून, गर्भावस्थाकाळापासून ते प्रसूतीपर्यंत सर्व काळजी या योजनेंतर्गत घेतली जाते. प्रसूती किंवा पूर्वीचे फक्त एकच सिझेरियन झालेल्या स्त्रियांसाठी ही योजना उपलब्ध आहे. स्टॉल सुविधा कस्तुरी सभासदांसाठी (शुल्क : 200 रुपये) आधी नोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ः 9423824997, 9923617769.