

कोल्हापूर : महिलांच्या सौंदर्य, आत्मविश्वास आणि कलागुणांना झळाळी देणारा दै. ‘पुढारी कस्तुरी क्लब’चा वर्धापन दिन सोहळा यंदा अधिकच दिमाखात रंगणार आहे. येत्या बुधवारी (दि. २९ ) राजर्षी शाहू स्मारक भवन येथे दुपारी १ ते ५ या वेळेत मिसेस कस्तुरी ही सौंदर्य स्पर्धा, ग्रुप डान्स तसेच होम मिनिस्टर या स्पर्धांसह लकी ड्रॉ आणि मेगा लकी ड्रॉ अशा बहारदार कार्यक्रमांतून महिलांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची पर्वणीच लाभणार आहे.
सोहळ्याची खरी रंगत ‘मिसेस कस्तुरी’ ही ग्लॅमरस सौंदर्य स्पर्धा वाढवणार आहे. स्पर्धक महिला आपल्या अदा आणि आत्मविश्वासाने रॅम्प गाजवणार असून पारंपरिक मराठमोळा रुबाब दाखवणारा ‘पैठणी राऊंड’, चित्रपटसृष्टीची भुरळ पाडणारा ‘बॉलीवूड राऊंड’ आणि पाश्चात्त्य सौंदर्याचा आविष्कार घडवणारा ‘इव्हिनिंग गाऊन राऊंड’ अशा तीन धमाकेदार टप्प्यांत ही स्पर्धा रंगणार आहे. याशिवाय सोहळ्यात नृत्याचा तडका लावण्यासाठी ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन केले असून, ३ ते ७ जणींच्या ग्रुपला यात आपली कला सादर करता येणार आहे. यातील विजेत्या ग्रुपला आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवले जाईल. यासोबतच होम मिनिस्टर खेळही इथे रंगणार असून, पैठणीची स्वप्नपूर्ती करत विजेत्या मानिनीला मानाच्या पैठणी साडीचा मान मिळणार आहे. अधिक माहितीसाठी ९१४६४८८१८३ येथे संपर्क साधावा.
रेशमी वैभवाचा विश्वास ‘चंद्ररूप’!
परंपरा, गुणवत्ता आणि वैभवशाली सौंदर्याचा संगम असलेले चंद्ररूप सिल्क साड्या हे नाव गेली सात दशके ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक ठरले आहे. गतवर्षी रामनवमीच्या शुभमुहूर्तावर चंद्ररूपने आपल्या ७५ वर्षांच्या अमृतमहोत्सवी प्रवासाचा अभिमानाने टप्पा पूर्ण केला. माणिकचंद कर्नावट या संस्थापकांनंतर संजय कर्नावट आणि आता तिसरी पिढी तन्मय कर्नावट हा वारसा जपत आहेत. आधुनिकतेची जोड देत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला दर्जेदार संग्रह उपलब्ध करून देत आहे. अस्सल रेशीम साड्यांचा वैविध्यपूर्ण आणि आकर्षक खजिना यामुळेच ‘चंद्ररूप’ हे नाव आजही साड्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहे.
मान्सून सेल आणि ऑफर्सचा धमाका
सध्या ‘चंद्ररूप’मध्ये मान्सून सेल सुरू असून त्याला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. फ्रेश साड्या तसेच सूटिंग-शर्टिंगवर १० ते ३० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे. महिलांसाठी खास आकर्षण असणाऱ्या पेशवाई, कांजीवरम, पैठणी, धर्मावरम, चंदेरी, महे्वरी अशा नानाविध साड्या खरेदीसाठी उपलब्ध आहेत. या दुकानाचे वैशिष्ट्य म्हणजे लता मंगेशकर कुटुंबीयांसह मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या खरेदीचे आवडीचे स्थान आहे.
‘लकी ड्रॉ’मध्ये बक्षिसांचा पाऊस !
‘लकी ड्रॉ’ विजेतीला ब्रँडेड एलईडी टीव्ही (LED TV), हेअर ड्रायर, हँड मिक्सर आणि इस्त्री अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. यासह ‘मिसेस कस्तुरी’ आणि ‘ग्रुप डान्स’मधील सहभागी महिलांमधून लकी ड्रॉ मध्ये तब्बल ३० नशीबवान विजेत्यांना आकर्षक ‘गोल्डन छल्ले’ जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
सर्व सभासदांनी बॉलीवूड किंवा रेट्रो लूकमध्ये यावे.