

कोल्हापूर : ‘गीतरामायण’ या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवा कोल्हापूरकर रसिकांसमोर पुन्हा एकदा सादर होणार आहे.
महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेल्या आणि भावगंधर्व सुधीर फडके यांनी स्वरसाज चढविलेल्या या सुरेल गीतरामायणाच्या सुरेल भक्तिरसात चिंब होण्याची संधी कोल्हापूरकरांना दैनिक ‘पुढारी’च्या माध्यमातून मिळत आहे.
हा भव्य कार्यक्रम शुक्रवार, 20 जून रोजी सायंकाळी 6 वाजता गोविंदराव टेंबे सभागृह (देवल क्लब), शाहू मैदानाजवळ, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक मेसर्स गोपिनाथ अनंत चिपडे सराफ, भाऊसिंगजी रोड आणि व्हीनस कॉर्नर आहेत, तर अॅस्टर आधार हॉस्पिटल हे हेल्थ पार्टनर असणार आहेत. या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके स्वतः गीतरामायण सादर करणार आहेत. रामचरित्राच्या विविध प्रसंगांवर आधारित गदिमांची 56 गीते आणि बापूंनी दिलेल्या सुमधुर चाली यांचा हा संगम गीतरामायणात पाहायला मिळतो.
ही गीते केवळ संगीत नसून एक भावानुभूती आहेत. गीते ऐकताना प्रत्येक शब्द मनाला भिडतो आणि रसिक श्रोत्यांना एका वेगळ्याच भावविश्वात नेतो. कार्यक्रमासाठी निःशुल्क प्रवेशिका पुढारी कार्यालय (भाऊसिंगजी रोड) आणि टोमॅटो एफएम ऑफिस, वसंत प्लाझा, राजाराम रोड येथे तसेच मेसर्स गोपिनाथ अनंत चिपडे सराफ यांच्या भाऊसिंगजी रोड आणि व्हीनस कॉर्नर येथील शोरूमवर उपलब्ध आहेत.
दैनिक पुढारी कार्यालय (भाऊसिंगजी रोड) गोपिनाथ अनंत चिपडे सराफ, व्हीनस कॉर्नर व भाऊसिंगजी रोड आणि टोमॅटो एफएम कार्यालय (वसंत प्लाझा, राजाराम रोड)
वेळ : सकाळी 10 ते सायंकाळी 6
अधिक माहितीसाठी संपर्क ः 9834433274
कार्यक्रम : गीतरामायण
सादरकर्ते : श्रीधर फडके
स्थळ : गोविंदराव टेंबे सभागृह (देवल क्लब), खासबाग मैदानजवळ, कोल्हापूर
दिनांक व वेळ : शुक्रवार, 20 जून,
सायंकाळी 6 वाजता प्रवेश : निःशुल्क