

कोल्हापूर : दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. बारावीचा निकाल आधीच लागलेला. आता प्रत्येक विद्यार्थी आणि त्याच्या पालकांना पुढील करिअरचे वेध लागले आहेत. करिअर संदर्भात अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभी आहेत. आता पुढे काय? कोणता कोर्स निवडायचा? कोणत्या क्षेत्रात जायचे? कुठल्या संस्थेत प्रवेश? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी मिळणार आहेत. दै. ‘पुढारी एज्यु दिशा’ हे बहुप्रतीक्षित शैक्षणिक प्रदर्शनात. तुमच्या पाल्याच्या भविष्याचे महाद्वार शुक्रवार (दि. 23 ) पासून उघडणार आहे. इथे करिअरच्या विविध पर्यायांची माहिती मिळेलच, शिवाय तुमच्या पाल्यासाठी तज्ज्ञांमार्फत करिअर मार्गदर्शन देखील मिळणार आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते सकाळी 10.30 वाजता होणार आहे. यावेळी सहभागी प्रमुख शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनास संजय घोडावत युनिव्हर्सिटी मुख्य प्रायोजक म्हणून लाभले आहेत, तर पॉवर्ड बाय प्रायोजक म्हणून पुणे येथील विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आहेत. पुणे येथील एम. आय. टी. - विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी आणि भारती विद्यापीठ हे प्रदर्शनाचे सहयोगी प्रायोजक असून पीसीईटीज पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी, पुणे, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे, एम. आय. टी. - ए. डी. टी. युनिव्हर्सिटी, पुणे तसेच चाटे शिक्षण समूह हे सहप्रायोजक आहेत.
या प्रदर्शनात राज्यभरातील नामांकित शैक्षणिक संस्था सहभागी होणार आहेत. करिअर मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ आणि नवे करिअर पर्याय एका छताखाली उपलब्ध असणार आहेत. विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, त्यांची गोंधळलेली अवस्था दूर व्हावी आणि पालकांना निश्चितता लाभावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
‘पुढारी एज्यु दिशा’ प्रदर्शनात वैद्यकीय इंजिनिअरिंग, व्यवस्थापन अर्थ आणि वाणिज्य विषयक प्रशासकीय सेवा, क्रिएटिव्ह (डिझाईन, अॅनिमेशन, मास कम्युनिकेशन, पत्रकारिता), संशोधन, संरक्षण आणि परदेशी शिक्षण अशा अनेकविध क्षेत्रातील असंख्य करिअरविषयी मार्गदर्शन मिळणार आहे.
महाराष्ट्रातील नामांकित सहभागी संस्था ः संजय घोडावत युनिव्हर्सिटी, कोल्हापूर विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, पुणे एम.आय.टी. विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी भारती विद्यापीठ (Deemed to be University), पुणे पीसीईटीज पिंपरी-चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) पुणे एम.आय.टी.- एडीटी युनिव्हर्सिटी चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस् वेलिंगकर एज्युकेशन, मुंबई ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी (AISSMS) इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडिया डॉ. डी. वाय. पाटील ज्ञान प्रसाद युनिव्हर्सिटी, पुणे एमआयटी आळंदी कॅम्पस (MITAOE, MITACSC, MITSDE) यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा पारुल युनिव्हर्सिटी, वडोदरा ए.एस.एम. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (KIT) डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोल्हापूर एम.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी डीकेटीई, इचलकरंजी राजरामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (RIT) स्पेक्ट्रम अॅकॅडमी, नाशिक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (PIBM) माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मालगाव, सावंतवाडी सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी के.एल.एस. गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बेळगाव शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापूर, डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, पुणे डेक्कन कॉलेज ऑफ इंटिरियर डिझाईन, कोल्हापूर टाईम इन्स्टिट्यूट द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडिया डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, आंबी, पुणे विद्या प्रबोधिनी द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया डॉ. डी. वाय. पाटील अँग्रीकल्चर आणि टेक्निकल युनिव्हर्सिटी, तळसंदे.
सकाळी 12 ते 1 : डॉ. स्वप्नील हिरीकुडे, विभाग प्रमुख, इलेक्ट्रॉनिकस अँड कम्युनिकेशन्स इंजिनीअरिंग, संजय घोडवत युनिव्हर्सिटी, कोल्हापूर
विषय : 12 वी नंतर उच्च शिक्षणाचे महत्व, संधी व आव्हाने
सायंकाळी 5 ते 6 : डॉ. सागर पांडे, सहाय्यक प्राध्यापक, सीएसई, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी
विषय : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए. आय.) मधील करिअरच्या संधी
स्थळ : डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवन, राजारामपुरी, कोल्हापूर
दिनांक : 23 ते 25 मे 2025
वेळ : सकाळी 10 ते रात्री 8
अधिक माहितीसाठी संपर्क : 9834433274