Pudhari Edudisha 2026 | ‘पुढारी एज्युदिशा 2026’उद्यापासून

Pudhari Edyudisha 2026 |
Pudhari Edudisha 2026
Published on
Updated on

कोल्हापूर : ‘दहावी आणि बारावीनंतर पुढे काय’, असा प्रश्न पडलेल्या आणि पुढील प्रवेश प्रक्रियेकडे डोळे लागून राहिलेल्या विद्यार्थी आणि पालकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच छताखाली देणारे दै. ‘पुढारी’ आयोजित लोकप्रिय व बहुप्रतीक्षित एज्युदिशा 2026 हे शैक्षणिक प्रदर्शन शनिवार (दि. 30) पासून कोल्हापुरात सुरू होत आहे. नामवंत शैक्षणिक संस्थांचा या प्रदर्शनात समावेश असून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

करिअरचे अगणित पर्याय, पारंपरिक कोर्सेसच्या पलीकडे जाऊन भविष्याचा वेध घेणारे अनेक पर्याय या प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत. यामध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, डिफेन्स, फार्मसी यासोबतच आजच्या काळातील अत्यंत गतिमान अशा एआय (अख), डेटा सायन्स, रोबोटिक्स, अ‍ॅग्रो टेक, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, रिसर्च आणि डिझाईन यांसारख्या आधुनिक क्षेत्रांतील करिअरच्या सुवर्णसंधींची माहिती थेट तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे. यावर्षी विशेषतः ‘न्यू एज स्किल्स’ आणि ‘ग्लोबल स्टडी अपॉर्च्युनिटीज’ (परदेशातील शिक्षणाच्या संधी) या घटकांवर अधिक भर दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ः8149582442, 9545327545.

दिग्गज ब्रँडस्ची भागीदारी

या शैक्षणिक उपक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘संजय घोडावत युनिव्हर्सिटी, कोल्हापूर’ हे आहेत; तर पावर्ड बाय प्रायोजक म्हणून ‘विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, पुणे’ हे लाभले आहेत. सहयोगी प्रायोजक म्हणून ‘एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी’ तर सहप्रायोजक म्हणून एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी पुणे, भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी, चाटे ग्रुप या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. पुणे, मुंबईसह देशभरातील नामांकित शिक्षण संस्था या प्रदर्शनात आपले स्टॉल लावणार आहेत.

प्रदर्शनाचे स्थळ व वेळापत्रक

कोल्हापूर : 30, 31 मे आणि 1 जून 2026

स्थळ : डॉ. व्ही. टी. पाटील मेमोरियल हॉल, राजारामपुरी.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पात्रता : इयत्ता दहावीसाठी 85 टक्के आणि बारावीसाठी 75 टक्के किंवा

त्यापेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी.

कोणी पाठवावे? : स्वतः विद्यार्थी, पालक किंवा संबंधित शाळा पाठवू शकतात.

काय करावे? : विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, शाळा/कॉलेजचे नाव आणि मार्कलिस्ट 8805007724 या क्रमांकावर व्हॉटस्अप करावी.

शिक्षण संस्थांसाठी सुवर्णसंधी आणि वैशिष्ट्ये : पुणे, मुंबई आणि देशभरातील अग्रगण्य शिक्षण संस्थांना हजारो गरजू विद्यार्थी आणि पालकांशी थेट संवाद साधण्यासाठी हे एक हक्काचे आणि प्रभावी व्यासपीठ आहे.

थेट संपर्क : कोल्हापूर जिल्ह्यांतील हजारो पालकांशी वन टू वन संवाद.

व्यापक प्रसिद्धी : दैनिक ‘पुढारी’च्या मुख्य अंकासह ‘पुढारी न्यूज’ चॅनेल, एफएम रेडिओ, ऑनलाईन आणि डिजिटल सोशल मीडिया माध्यमातून राज्यभर व्यापक प्रसिद्धी.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन : करिअर समुपदेशन सत्रांचे आयोजन केल्यामुळे दर्जेदार आणि महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांचा मोठा ओढा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news