कोल्हापूर : ‘पुढारी दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल’ला प्रचंड प्रतिसाद

रविवार ठरणार ‘खरेदी वार’ : ऑटोमोबाईल कंपन्यांच्या आकर्षक ऑफर्स
Pudhari Dussehra-Diwali shopping festival
कोल्हापूर : ‘पुढारी दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये शनिवारी झालेली गर्दी.Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : दसरा-दिवाळी खरेदीचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी दै. ‘पुढारी’च्या वतीने आयोजित ‘दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये शनिवारी ग्राहकांनी तुफान गर्दी केली. रविवारी या गर्दीचा उच्चांक गाठला जाण्याची अपेक्षा आहे. फेस्टिव्हलमध्ये असलेल्या खास ऑफर्समुळे ग्राहकांची पावले प्रदर्शनाकडे वळली आहेत. रविवारी गर्दीचा नवा उच्चांक होऊन रविवार ‘खरेदी वार’ ठरणार आहे. हे प्रदर्शन 8 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10.30 ते रात्री 8.30 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

प्रदर्शनात एकाच ठिकाणी सर्वसाधारण चारचाकी वाहनांपासून लक्झरी सेग्मेंटमधील गाड्या पाहण्याची, त्यांच्या ऑफर समजून घेण्याची संधी मिळत आहे. दसरा खरेदीसाठी खास ऑफर्ससह ग्राहकांना नवे वाहन घरी घेऊन जाण्याची संधी मिळत असल्याने वाहनप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

याशिवाय गृहोपयोगी वस्तू, पॅकिंगचे खाद्यपदार्थ, चहा पावडर, गुळाच्या चहाचे रेडीमिक्स यासारखे वैविध्यपूर्ण स्टॉल्स प्रदर्शनात मांडण्यात आले असून, त्यांनीही खरेदीदारांसाठी खास सवलती दिल्या आहेत.

कपडे, आयुर्वेदिक वस्तू, कॉस्मेटिक पदार्थ, मसाले, पूजेचे साहित्य यासारख्या वस्तूंसाठीही खरेदीदारांची मोठी गर्दी होत आहे.

रविवारी सुट्टी असल्याने या ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी मोठ्या संख्येने ग्राहक प्रदर्शनात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क - 9834433274.

ऑफर्स अशा...

उन्नती मोटर्समध्ये महिंद्राच्या गाड्यांवर 7 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट उपलब्ध आहे आणि नियोस मॉडेलवर 74 हजार रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे. तसेच महिंद्राच्या थार रॉक्स या मॉडेलचे लाँचिंग करण्यात आले आहे.

युनिक प्रिमियामध्ये हर्ले डेव्हिडसनच्या मोटारसायकल्स स्पॉट बुकिंग केल्यास 15 हजार रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे.

युनिक ह्युंदाईमध्ये सर्व मॉडेल्सवर 10 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत डिस्काऊंट तसेच 10 हजार रुपयांचा एक्स्चेंज बोनस दिला जात आहे.

काले बजाजमध्ये पल्सरच्या सर्व मॉडेल्सवर 10 हजार रुपयांचा डिस्काऊंट आणि सर्व पेट्रोल गाड्यांवर स्क्रॅच कूपनद्वारे स्मार्ट टी.व्ही., स्मार्ट वॉच, चांदीचे नाणे यासारखी बक्षिसे मिळवण्याची संधी आहे.

साई सर्व्हिसमध्ये मारुती सुझुकीच्या मॉडेल्सवर 65,100 रुपयांपर्यंतच्या डिस्काऊंटची ऑफर दिली जात असून, दसर्‍याच्या दिवशी गाडीची डिलिव्हरी व स्पॉट बुकिंगवर सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे.

कोंडुसकर कियामध्ये एक्स्चेंज बेनिफिट आणि किया सेल्टॉससाठी पाच वर्षांची अतिरिक्त वॉरंटी दिली जात आहे.

टाटाच्या स्काय वन या डिलरशिपमार्फत सर्व मॉडेल्सवर भरपूर डिस्काऊंटस् देण्यात आले आहेत. डेमो गाड्या आकर्षक किमतीत विक्रीसाठी उपलब्ध असून, ईव्ही कारवर 0 टक्के डाऊन पेमेंटवर कर्जाची सोय उपलब्ध आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news