पुढारी वृत्तसेवा; बहारदार आणि माहितीपूर्ण लेखांचा खजिना 'पुढारी दीपस्तंभ २०२४' हा दिवाळी विशेषांक तुमच्यासाठी घेऊन आलाय. कला, मनोरंजन आणि इतिहास या विषयावरील लेख यात वाचायला मिळतील. आजच विकत घ्यायला हवा असा हा वर्षभराचा ठेवा आहे. २२४ पानांचा हा दिवाळी विशेषांक सर्वत्र उपलब्ध आहे. (Pudhari Deepstambh 2024 Diwali Ank)
यावेळी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये चर्चेत आलेले मराठमोळे नाव म्हणजे छाया कदम. छाया कदम यांची विशेष मुलाखत या अंकात वाचायला मिळणार आहे. शर्मिष्ठा भोसले यांनी घेतलेली ही मुलाखत छाया कदम यांचा जीवनपट उलगडणार आहे.
महाराष्ट्राच्या मनोरंजन विश्वातील महत्त्वाचे आणि तितकेच वादग्रस्त नाव म्हणजे गौतमी पाटील. रेणुका कल्पना यांनी गौतमी पाटीलशी साधलेला संवाद वाचायला तुम्हाला नक्कीच आवडेल. अमोल उदगिरकर यांनी लिहिलेला 'द विद्या बालन' हा विद्या बालन हिचा अगळावेगळा करिअर ग्राफ मांडणारा लेख या अंकाचे एक ठळक वैशिष्ट्य आहे.
मराठी माणसाच्या मनातील हळका कोपरा म्हणजे इतिहास. इतिहासावर प्रेम करणाऱ्या वाचकांसाठी या दिवाळी अंकात एक खास भेट असणार आहे. माँसाहेब जिजाऊंना घडवणारे त्यांचे वडील लखुजीराजे म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात दुर्लक्षित राहिलेले व्यक्तिमत्त्व. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा धांडोळा घेतला आहे, इतिहास संशोधक केतन पुरी यांनी.
तसेच शहाजीराजे यांचे नाव संपूर्ण हिंदुस्थानात गाजलेले भातवडीचे युद्धाला ४०० वर्षं पूर्ण झाली आहेत. या युद्धाचा पट उलगडणारा लेख लिहिला आहे इतिहास अभ्यासक सुरेश पवार यांनी. हे दोन्ही लेख महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्लक्षित घटनांना उजाळा देतील.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्यातील पक्षपात, गिग इकॉनॉमी आणि नव्या अर्थव्यवस्थेतील गुलामगिरी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा परस्पर पुरक प्रवास, रिलबाजांची दुनिया, हिंदी साहित्यातील नवा साहित्यप्रवाह असा बहारदार आणि माहितीपूर्ण लेखांचा खजिना हा दिवाळी अंक तुमच्यासाठी घेऊन आला आहे.