kolhapur | शहर वाहतूक सुधारण्यासाठी ‘पुढारी’चे मोठे योगदान : नंदकुमार मोरे

पुढारी रीलिफ फाऊंडेशनतर्फे वाहतूक विभागाला बॅरिकेडस् प्रदान
कोल्हापूर : पुढारी रीलिफ फाऊंडेशनच्या वतीने शहर वाहतूक विभागाला बॅरिकेडस् प्रदान करताना दै. ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक विजय जाधव. शेजारी पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे, सरव्यवस्थापक (ऑपरेशन) राजेंद्र मांडवकर, एचआर व्यवस्थापक बाहुबली बोगार आणि हवालदार तानाजी सुंभे आदी उपस्थित होते.
कोल्हापूर : पुढारी रीलिफ फाऊंडेशनच्या वतीने शहर वाहतूक विभागाला बॅरिकेडस् प्रदान करताना दै. ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक विजय जाधव. शेजारी पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे, सरव्यवस्थापक (ऑपरेशन) राजेंद्र मांडवकर, एचआर व्यवस्थापक बाहुबली बोगार आणि हवालदार तानाजी सुंभे आदी उपस्थित होते. (छाया ः मिलन मकानदार)
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी दैनिक ‘पुढारी’ नेहमीच अग्रभागी राहिला आहे. केवळ बातम्यांच्या माध्यमातून प्रश्न मांडून न थांबता, प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक योगदान देण्याच्या परंपरेनुसार पुढारी रीलिफ फाऊंडेशनच्या वतीने सोमवारी शहर वाहतूक विभागाला नवीन प्लास्टिक बॅरिकेडस् प्रदान करण्यात आले. शहराची वाहतूक व्यवस्था सुधारण्यात ‘पुढारी’चे मोठे योगदान असल्याचे शहर वाहतूक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी यावेळी सांगितले.

दै. ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक विजय जाधव आणि सरव्यवस्थापक (ऑपरेशन) राजेंद्र मांडवकर यांच्या हस्ते पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्याकडे बॅरिकेडस् सुपूर्द करण्यात आले. हे बॅरिकेडस् प्रामुख्याने शहरातील गजबजलेले प्रमुख चौक, एकेरी वाहतुकीचे मार्ग आणि सण-उत्सवांच्या काळात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी वापरले जाणार आहेत.

वजनाने हलके आणि टिकाऊ असल्याने पोलिसांना गरजेनुसार त्यांची तातडीने हालचाल करणे सोपे होणार आहे. या बॅरिकेडस्मुळे पोलिसांच्या कामकाजात मोठी मदत होईल, यापूर्वीही ‘पुढारी’ने वाहतूक विभागाला वेळोवेळी सहकार्य केले आहे, असेही नंदकुमार मोरे यावेळी म्हणाले.

याप्रसंगी दै.‘पुढारी’चे एचआर व्यवस्थापक बाहुबली बोगार आणि वाहतूक विभागाचे हवालदार तानाजी सुंभे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news