कोल्हापूर : नागाळा पार्क येथील मेरी वेदर ग्राऊंडवर सुरू असलेल्या ‘पुढारी’ कोल्हापूर कार्निव्हल 2025 मध्ये दुसर्या दिवशी ग्राहकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मनपसंत खरेदीची पर्वणी, खमंग खाद्यपदार्थांचा दरवळ आणि जादुई सांगीतिक संध्याकाळ यामुळे हा महोत्सव कोल्हापूरकरांसाठी आनंदाचा अविस्मरणीय सोहळा ठरत आहे. हा महोत्सव ‘माणिकचंद ऑक्सिरिच’ पॉवर्ड बाय असून, ‘वारणा आईस्क्रीम’ असोसिएट स्पॉन्सर आणि ‘लकी फर्निचर’ हे या उपक्रमाचे फर्निचर पार्टनर आहेत.
मैदानावर उभारलेल्या भव्य मंडपात 130 हून स्टॉल्सवर ग्राहकांची झुंबड उडाली आहे. गारमेंटस्, होम अप्लायन्सेस, फर्निचर आणि गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी महिलांची विशेष पसंती दिसून येत आहे, तर दुसरीकडे खाद्यप्रेमींसाठी या ठिकाणी जणू मेजवानीच सजली होती. बाजरीची भाकरी, तांबडा-पांढरा रस्सा, बिर्याणी आणि चटकदार चाटचा स्वाद घेण्यासाठी खवय्यांच्या रांगा लागल्या आहेत. ‘वारणा आईस्क्रीम’च्या स्टॉल्सवरही आबालवृद्धांची गर्दी होती.
अम्युझमेंट पार्कमधील उंच पाळणे आणि विविध राईडस्वर लहानग्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. कोल्हापूरकरांनी या ऐतिहासिक आनंदाचा भाग होण्यासाठी आपल्या परिवारासह नक्की भेट द्यावी, असे आवाहन दैनिक ‘पुढारी’च्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्कः 9545327545
आजचे आकर्षण
प्रल्हाद व विक्रम प्रस्तूत ‘बॉलीवूड अनप्लग्ड’ हा सांगीतिक कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात येणार आहे.
रॉकस्टार कराओकेच्या सुरावटींनी जिंकली मने
कार्निव्हलच्या मुख्य आकर्षणापैकी एक म्हणजे रॉकस्टार कराओके स्टुडिओफ ची सांगीतिक मैफल! या कार्यक्रमामुळे कार्निव्हलची रंगत वाढली. प्रिया इंगळे, मनीषा मोटे, अरुण उलपे, मच्छिंद्र कारंडे, सौरभ आवटे आणि शैलेश जाधव यांच्यासह रॉकस्टार ग्रुपच्या कलाकारांनी आपल्या सुरावटींनी कार्निव्हलला सांगीतिक स्पर्श दिला. जुन्या-नव्या गाण्यांच्या सादरीकरणामुळे वातावरण मंत्रमुग्ध झाले. अनेक तरुणांनी या सुरावटींच्या तालावर ठेका धरत मैफलीचा आनंद लुटला.