कोल्हापूर : नागाळा पार्क येथील मेरी वेदर ग्राऊंडवर सुरू असलेल्या ‘पुढारी कोल्हापूर कार्निव्हल 2025’ तिसर्या दिवशी ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शनिवार (दि. 27) हाऊसफुल्ल ठरला. आता या महोत्सवाचे शेवटचे दोनच दिवस उरले असून, रविवारी सट्टी असल्याने गर्दीचे सर्व विक्रम मोडीत निघण्याची शक्यता आहे.
हा महोत्सव ‘माणिकचंद ऑक्सिरिच’ पॉवर्ड बाय असून, ‘वारणा आईस्क्रीम’ असोसिएट स्पॉन्सर आणि ‘लकी फर्निचर’ हे या उपक्रमाचे फर्निचर पार्टनर आहेत. महोत्सवातील 130 हून अधिक स्टॉल्सवर शनिवारी सकाळपासूनच ग्राहकांची सहकुटुंब, सहपरिवार गर्दी होती. ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि विशेषतः फर्निचर दालनात मोठी गर्दी पाहायला मिळाली.
जिभेचे चोचले पुरवणारी खवय्येगिरी
कार्निव्हलमध्ये खाद्यपदार्थांची जणू जत्राच भरली आहे. मांसाहारी प्रेमींसाठी बांबू बिर्याणी, कबाब, पहाडी तंदूर, फिश आणि स्टार्टर्सच्या वैविध्यपूर्ण डिशेस उपलब्ध आहेत, तर शाकाहारी खवय्ये चटपटीत डोसा, मंचूरियन, चायनीज आणि चौपाटी आयटम्सवर ताव मारत आहेत. कोल्हापुरी चवीसोबतच या नवनवीन ‘फ्युजन डिशेस’नी टेस्ट बडस्ना अक्षरशः सुखावले आहे. सायंकाळी झगमगत्या रोषणाईने उजळलेल्या अम्युझमेंट पार्कमध्ये लहानग्यांचा आनंद ओसंडून वाहत होता.
आजचे खास आकर्षण
रविवार, दि. 28 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता ‘धमाल मस्ती लाईव्ह रॉकिंग’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हा कार्यक्रम कोल्हापूरकरांसाठी पर्वणी ठरेल.