

बिद्री : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील शिक्षण आणि करिअरची दिशा ठरविताना अनेक विद्यार्थी व पालक संभ्रमात असतात. कोणता अभ्यासक्रम निवडायचा, प्रवेश प्रक्रिया कशी असते, कोणत्या क्षेत्रात भविष्यात अधिक संधी आहेत, याबाबतची अचूक माहिती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत अनेकदा पोहोचत नाही. हीच गरज ओळखून ‘पुढारी’ माध्यम समूहातर्फे ७ जून रोजी मुदाळ येथे ‘पुढारी कॅम्पस टू करिअर’ सेमिनार आयोजित करण्यात आला आहे.
या सेमिनारमध्ये आपल्या परिसरातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. विशेष म्हणजे करिअरविषयक माहिती मिळविण्यासाठी कोल्हापूर, पुणे किंवा इतर शहरांमध्ये जाण्याची गरज नाही आता ही संधी मुदाळमधील के. पी. पाटील पॉलिटेक्निक सभागृहात ७ जूनला सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान उपलब्ध होत आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, बी.फार्मसी, व्यवस्थापन तसेच विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती, विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी, गुणवत्ता आणि भविष्यातील रोजगार संधी लक्षात घेऊन योग्य करिअर निवडीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
पुण्यातील खासगी व डीम्ड विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती योजना आणि शैक्षणिक कर्ज प्रक्रियेबाबतही उपयुक्त माहिती मिळणार आहे. या उपक्रमातून जिल्ह्यातील १०० विद्यार्थ्यांना पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांना माफक दरात भेट देण्याची संधीही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संस्था पाहून भविष्यातील करिअरची दिशा मिळणार आहे. सेमिनारसाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानही यावेळी करण्यात येणार आहे.
सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी...
विद्यार्थ्यांनी व पालकांनी नोंदणी करणे आवश्यक.
पुढारी कार्यालयात उपलब्ध फॉर्म भरून देता येईल.
अधिक माहितीसाठी या ९५७००१७००३ मोबाईल क्रमांकावर संपर्क करा.
सोबत दिलेल्या क्यूआर कोडद्वारे ऑनलाईन नोंदणी करता येईल.