Pudhari Campus To Career | ‘पुढारी’ आहे साथीला; मग करिअरची चिंता कशाला?

७ जून रोजी मुदाळमध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन; पुण्यातील नामांकित संस्थांना भेटीची संधी
Pudhari Campus To Career
Pudhari Campus To CareerPudhari
Published on
Updated on

बिद्री : विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हव्या असलेल्या करिअरविषयक मार्गदर्शनासाठी आता जास्त दिवस वाट पाहण्याची आवश्यकता नाही. तीनच दिवसांमध्ये अर्थात येत्या ७ जूनला ‘पुढारी’ माध्यम समूहातर्फे ‘पुढारी कॅम्पस टू करिअर’ या विशेष उपक्रमांतर्गत मुदाळ (ता. भुदरगड) येथे १२ वी पास विद्यार्थ्यांना विशेष तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. येथील के. पी. पाटील पॉलिटेक्निक सभागृहात सकाळी १० ते दुपारी १ या कालावधीत पार पडणार्‍या या उपक्रमासाठी पूर्व नावनोंदणी अनिवार्य असून, या उपक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानदेखील केला जाणार आहे.

या सेमिनारमध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, बी. फार्मसी, व्यवस्थापन, तसेच इतर सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी लागणारी संपूर्ण प्रवेश प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगितली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. याच मार्गदर्शनाच्या आधारे विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या क्षेत्रात करिअर करता येईल किंवा करिअरच्या नव्या वाटा आणि सुवर्णसंधी याविषयी निवड करण्याची संधी मिळणार आहे.

करिअर निवडीसाठी योग्य मार्गदर्शन हा या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग असून, या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांची आवड, क्षमता, शैक्षणिक पार्श्वभूमी आणि भविष्यातील संधी यांचा विचार करून तज्ज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन दिले जाणार आहे. याशिवाय खासगी विद्यापीठे, डीम्ड विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयांसाठी होणार्‍या प्रवेश परीक्षा, त्यांची प्रक्रिया आणि संधी याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे. सरकार व खासगी शिष्यवृत्ती योजना, तसेच शैक्षणिक कर्ज मिळविण्याची प्रक्रिया यावरही सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

सर्व प्रवेश प्रक्रियांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, त्यांची अचूकता, तपासणी आणि वेळेत सादरीकरण यासाठीही विद्यार्थ्यांना व पालकांना प्रत्यक्ष मदत मिळणार आहे. त्यामुळे ‘पुढारी कॅम्पस टू करिअर’ अंतर्गत आयोजित हे सेमिनार करिअर घडविणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी निर्णायक ठरणार आहेत. यातून निवडलेल्या जिल्ह्यातील १०० विद्यार्थ्यांना ‘पुढारी’ माध्यम समूहाच्या वतीने पुणे येथे दोन दिवसांची माफक दरात सहल आयोजित केली असून पुण्यातील नामांकित संस्थेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊन स्वेच्छेने करिअर निवडण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

काय आहे ‘पुढारी कॅम्पस टू करिअर’

बारावीनंतर करिअर करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी संपूर्ण प्रवेश मार्गदर्शन

करिअर निवडीसाठी तज्ज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन

खासगी, डीम्ड विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांची माहिती

सरकार व खासगी शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर माहिती

शैक्षणिक कर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन

सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी...

विद्याथ्यांनी व पालकांनी नोंदणी करणे आवश्यक

पुढारी कार्यालयात उपलब्ध फॉर्म भरून देता येईल.

अधिक माहितीसाठी या ९५७०० १७००३ मोबाईल क्रमांकावर संपर्क करा.

सोबत दिलेल्या क्यूआर कोडद्वारे ऑनलाईन नोंदणी करता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news