

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून दूषित, दुर्गंधीयुक्त आणि गढूळ पाणीपुरवठा होत आहे. पाण्यात गाळ, कचरा आणि घाणीचा प्रचंड प्रमाणात समावेश असल्याने ‘हे पाणी आहे की गटार?’ असा संतप्त सवाल उपस्थित करत अखिल भारत हिंदू महासभेने महापालिकेत आंदोलन केले. यावेळी उपायुक्त परितोष कंकाळ यांना निवेदन दिले.
दूषित पाण्यामुळे कॉलरा, अतिसार, त्वचारोगांसह इतर आजारांचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. पाईपलाईन गळती, चेंबर लिकेज, क्लोरीनेशनचा अभाव यांकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत हे कृत्य नागरिकांच्या जीवाशी खेळणारा प्रशासकीय गुन्हा असल्याचे महासभेने नोंदवले. महिला आघाडीनेही घोषणाबाजीसह तीव— आवाज उठवला. दरम्यान, उपायुक्तांनी पाईपलाईन दुरुस्ती आणि टँकरद्वारे स्वच्छ पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले. महिन्यात प्रश्न सुटला नाही, तर घागर मोर्चा काढू, असा इशारा दिला.