Prostitution racket busted | कपिलतीर्थ मार्केट, निवृत्ती चौकात वेश्या अड्ड्याचा पर्दाफाश; दोघांना अटक

Prostitution racket busted |
Prostitution racket busted | कपिलतीर्थ मार्केट, निवृत्ती चौकात वेश्या अड्ड्याचा पर्दाफाश; दोघांना अटक
Published on
Updated on

कोल्हापूर : शहरात मध्यवर्ती कपिलतीर्थ मार्केटमधील साई मसाज पार्लरसह निवृत्ती चौकातील साई निवास लॉजवरील हायप्रोफाईल वेश्या अड्ड्याचा राजवाडा पोलिसांनी पर्दाफाश केला. एका पीडित महिलेची सुटका करून मसाज पार्लर सेंटर चालविणार्‍या महिलेसह दोघांना बेड्या ठोकल्या. शहरात सतत वर्दळ असलेल्या परिसरात बेधडक कुंटणखाना चालविल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांतून संतापाची लाट उसळली आहे.

शुभांगी चंद्रकांत साळुंखे (45, रा. तिसरा बसथांबा फुलेवाडी) व योगेश दत्तात्रय ढवळे (32, रा. सरनाईक वाड्याजवळ कोल्हापूर, मूळ गुणवडी, ता. बारामती पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने संशयितांना तीन दिवसाची पोलिस कोठडी बजावली आहे.संशयित शुभांगी साळुंखे कपिलतीर्थ मार्केट परिसरात साई मसाज पार्लर चालविते व योगेश ढवळे निवृत्ती चौक परिसरात साई निवास लॉज चालवितो. दोन्हीही संशयित संगनमताने हायप्रोफाईल वेश्या अड्डा चालवितात.

कोल्हापुरात मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना!

शहरात सतत वर्दळ असलेल्या परिसरातील कपिलतीर्थ मार्केट व निवृत्ती चौकातील लॉजवर बेधडक कुंटणखाना चालविल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांतून संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी महिलेसह दोघांना बेड्या ठोकल्या असून शुभांगी साळुंखे कपिलतीर्थ मार्केट परिसरात गिर्‍हाईक शोधून त्यांना असहाय महिलांची छायाचित्रे दाखविते. छायाचित्र पाहून दर ठरविला जातो. दोन हजारांपासून ते सात हजारांपर्यंत गिर्‍हाईकांकडून रक्कम उकळली जाते. सौदा ठरल्यानंतर असहाय महिला, युवतीला बोलावून साई निवास लॉजवर पाठविले जाते. याबाबतची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे, उपनिरीक्षक महेश पाटील, अभिजित भोर, सहायक फौजदार नामदेव पाटील, कॉन्स्टेबल मनीषा काटकर यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा एकाचवेळी साई मसाज पार्लर व साई निवास लॉजवर छापा टाकून कारवाई केली.

महिलांच्या छायाचित्रांचा अल्बम हस्तगत

पोलिस निरीक्षक किरण लोंढे म्हणाले, साई मसाज पार्लरसह साई निवास लॉजवर छापा टाकून पथकाने तत्काळ झडती घेतली. 38 हजार 500 रूपयाच्या मुद्देमालासह असहाय्य महिला, युवतींच्या छायाचित्रांचा अल्बम हस्तगत केला. सहा ते सात महिन्यापासून संशयिताचे कारनामे सुरू होते. रॅकेटमध्ये आणखी काही संशयितांचा सहभाग असावा, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news