kolhapur | अवैध गर्भलिंग निदान, गर्भपातप्रकरणी ११ जणांच्या मालमत्तेवर येणार टाच

मोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्यांच्या मालमत्तेची माहिती घेण्याचे काम सुरू
kolhapur |
kolhapur | अवैध गर्भलिंग निदान, गर्भपातप्रकरणी ११ जणांच्या मालमत्तेवर येणार टाचFile Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणी पोलिसांनी मोकाअंतर्गत कारवाई केलेल्या ११ जणांना करवीर पोलिस पुन्हा अटक करणार आहेत. त्यांच्यासह नातेवाईकांच्या मालमत्तेची चौकशी होणार असून, मालमत्ता जप्तीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपातप्रकरणी मोकाअंतर्गत कारवाईनंतर स्वप्निल पाटील, श्रीमंत पाटीलसह सर्वच ११ आरोपींना पुन्हा अटक होणार आहे. या टोळीवर गेल्या सहा वर्षांत करवीर (७), जुना राजवाडा (१), राधानगरी (२), भुदरगड (१) असे ११ गुन्हे दाखल आहेत. या प्रत्येक गुन्ह्यात जप्त केलेले मशिन, आलेले पेशंट, झालेल्या स्त्री भ्रूणहत्या यांचा सखोल तपास करण्यात येणार आहे. हा तपास करवीर पोलिस उपअधीक्षक आप्पासो पवार करणार आहेत. हा गुन्हा मोका न्यायालयाकडे वर्ग होणार आहे. अत्यंत संवेदनशील गुन्ह्याचा जलद आणि सखोल तपास केल्याने पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह पथकाचा क्राईम आढावा बैठकीत पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी विशेष सत्कार केला. आरोपी व त्यांच्यावर दाखल गुन्हे कंसात : विजय कोळसकर (६), स्वप्निल पाटील (५), श्रीमंत पाटील (४), प्रशांत जाधव (३), महेश पाटील, दत्तात्रय पाटील, ओंकार कराळे (२), सुनील पाटील, शिवप्रसाद पाटील, अजित टिपुगडे (१).

आरोपींसह नातेवाईकांच्या मालमत्तेची चौकशी

मालमत्तेची माहिती घेण्याचे कामही करवीर पोलिसांनी सुरू केले आहे. संशयितांसह त्यांच्या पत्नी, आई, वडील, इतर नातेवाईकांच्याही मालमत्तेची माहिती संकलित होणार आहे. ही सर्व मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कळमकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news