

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीकृष्ण महाजन (वय 57) यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून आणि नात असा परिवार आहे.
10 एप्रिल रोजी सकाळी फिरण्यासाठी गेले असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. गेले 12 दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते. अखेर खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.