Moneylending Fraud | सहा लाखांसाठी उकळले अडीच कोटी

आठजणांवर गुन्हा; तीन अटकेत
Moneylending Fraud |
Moneylending Fraud | सहा लाखांसाठी उकळले अडीच कोटी
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : महिलेने व्यवसायासाठी घेतलेल्या ६ लाख रुपयांसाठी खासगी सावकारांनी २ कोटी ५२ लाख रुपयांची वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. सावकारांनी कुटुंबास ठार मारण्‍यासह दोन वर्षीय मुलीस ओलीस ठेवण्याची धमकी देऊन ही रक्कम उकळल्याचे गीता स्वप्‍निल मोरे (वय ३२, रा. सोनाळी, ता. करवीर, सध्या चिंतामणी पार्क, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, कोल्हापूर) यांनी फिर्यादीत म्‍हटले आहे.

याप्रकरणी सिद्धेेश मिलिंद गायकवाड (२५, रा. शिवाजी पेठ), अजिंक्य संभाजी जाधव (२४, रा. बोंद्रेनगर), स्वाती सुनील सिन्‍नूर (रा. शिवाजी पेठ) या तिघांना अटक केली. त्‍यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तर, स्वप्‍निल जाधव (लाला शेठ), सरिता मिलिंद गायकवाड (रा. शिवाजी पेठ), तेजस चंद्रकांत माने, गायत्री अजिंक्य साळोखे-गायकवाड, अजिंक्य अशोक साळोखे (रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांचा पोलिस शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news