

कोल्हापूर : केंद्रीय अर्थसंकल्पानंतरही सोन्या-चांदीच्या दरातील वाढ बुधवारीही कायम राहिली. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 87 हजार 100 रुपयांवर पोहोचला असून, चांदीचा दर 98 हजार 400 रुपये प्रति किलो झाला आहे. हे दर आतापर्यंतचे उच्चांकी असल्याचे सराफ बाजारातील जाणकारांनी सांगितले.
मंगळवारी (दि. 4) 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 86 हजार रुपये होता, तर चांदीचा दर 96 हजार 700 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला होता. कोल्हापूर सराफ बाजारात जीएसटी वगळता 24 कॅरेट सोन्याचा दर 84 हजार 560 रुपये प्रती 10 ग्रॅम, तर चांदीचा दर 95 हजार 530 रुपये प्रती किलो आहे. विशेषतः लग्नसराईच्या हंगामात हा दर वाढण्याची शक्यता असल्याचे सराफ बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे ग्राहक आणि गुंतवणूकदारांनी बाजारपेठेच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचेही ते सांगतात. विशेषतः, लग्नसराईच्या हंगामात हा दर वाढण्याची शक्यता असल्याचे सराफ बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.