Kagal Politics | हसन मुश्रीफ यांना धक्का : मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबईत भाजप कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांसह केला प्रवेश
Murugud Praveensingh Patil join BJP
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत प्रवीणसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला(Pudhari Photo)
Published on
Updated on

Murugud Praveensingh Patil join BJP

मुदाळतिट्टा : मुरगुडचे माजी नगराध्यक्ष व बिद्री सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक प्रवीणसिंह वि.पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मुंबई येथे भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, कागल तालुक्यातील मुरगूड गावचा दमदार माणूस म्हणजे प्रवीणसिंह पाटील होय. ३० ते ३५ वर्षे पाटील घराण्याकडे नगरपालिकेची सत्ता असून त्यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याचा मान पटकावला आहे. यावेळी मुरगूड नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. बिद्री सहकारी साखर कारखान्यातील एक अनुभवी संचालक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. प्रवीणसिंह पाटील यांनी केलेल्या भाजप प्रवेशामुळे कागल तालुक्यामध्ये भाजपला ताकद मिळाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Murugud Praveensingh Patil join BJP
सांगली फाटा-उचगाव, कागल उड्डाणपूल, बास्केट ब्रिजचा ‘डीपीआर’; आठवड्यात केंद्राकडे

भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी स्वागत व प्रस्ताव केले. प्रविणसिंह पाटील यांना भाजपचा स्कार्फ व पुष्पगुच्छ देऊन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अमरीश घाटगे, कृष्णराज महाडिक, कोल्हापूर भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, जिल्हा चिटणीस तानाजी कुरणे, मंडल अध्यक्ष एकनाथ पाटील व अमर पाटील, कागल तालुका चिटणीस मयूर सावर्डेकर , शहराध्यक्ष पृथ्वीराज कदम, दिग्विजय पाटील, सत्यजित पाटील, सम्राट म्हसवेकर संपत कोळी वसंतराव शिंदे , सुधीर सावर्डेकर, जगन्नाथ पुजारी संजय मोरबाळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news