Electricity disruption: कोल्हापूर-सांगलीत 5,498 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

विजेचा वापर करूनही मासिक बिलांचा नियमित भरणा न झाल्याने महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलात तब्बल 51 कोटी 77 लाख रुपयांची थकबाकी आहे
Electricity disruption
Electricity disruption: कोल्हापूर-सांगलीत 5,498 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडितFile Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : विजेचा वापर करूनही मासिक बिलांचा नियमित भरणा न झाल्याने महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलात तब्बल 51 कोटी 77 लाख रुपयांची थकबाकी आहे. परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर अशा विविध वर्गवारीतील 4 लाख 38 हजार 63 ग्राहकांकडे ही थकबाकी आहे.

थकबाकी वसुलीसाठी गेल्या दोन महिन्यांत 5 हजार 498 ग््रााहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला आहे. महावितरणने थकबाकीदार ग््रााहकांनी देय दिनांकापूर्वी बिलांचा भरणा करून पुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन केले आहे.

सुट्टीच्या दिवशीही बिल भरणा केंद्रे सुरू

ग्राहकांना थकीत वीज बिलांचा भरणा सुलभ व्हावा, यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महावितरणची अधिकृत वीज बिल भरणा केंद्रे मार्च 2026 अखेरपर्यंत शनिवारी, रविवारी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहेत. संकेतस्थळावर आणि महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे ग्राहकांना केव्हाही, कुठूनही ऑनलाईन पद्धतीने बिल भरता येते. डिजिटल माध्यमातून भरणा केल्यास देय रकमेवर 0.25 टक्के सवलत दिली जाते. पाच हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या लघुदाब ग्राहकांसाठी आरटीजीएस/एनईएफटी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती

कोल्हापूर ग्रामीण-1 विभागात 52,568 ग्राहकांकडे 3.41 कोटी, ग्रामीण-2 मध्ये 55,475 ग्राहकांकडे 6.02 कोटी, जयसिंगपूर विभागात 36,397 ग्राहकांकडे 3.16 कोटी, इचलकरंजी विभागात 26,961 ग्राहकांकडे 6.11 कोटी, तर गडहिंग्लज विभागात 29,101 ग्राहकांकडे 1.78 कोटी रुपयांची थकबाकी आहे. जिल्ह्यातील 2,571 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news