Poland Prime Minister visits India | पोलंडच्या पंतप्रधानांचा २०२७ च्या प्रारंभी कोल्हापूर दौरा प्रस्तावित

डोनाल्ड टस्क - संभाजीराजे यांची बंगळुरात भेट
Poland Prime Minister visits India |
Poland Prime Minister visits India | पोलंडच्या पंतप्रधानांचा २०२७ च्या प्रारंभी कोल्हापूर दौरा प्रस्तावित
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : भारत दौऱ्यावर असलेले पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क व संभाजीराजे यांची शुक्रवारी बंगळूर येथे विशेष भेट झाली. भारत व पोलंड यांच्यामधील ऐतिहासिक मैत्री व सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली. आगामी २०२७ च्या प्रारंभी प्रस्तावित ‘वळीवडे म्युझियम फॉर ह्युमॅनिटी अँड पीस’च्या उद्‌घाटनासाठी कोल्हापूर दौरा करण्याबाबतही त्यांनी सकारात्मकता दर्शविली.

या भेटीत संभाजीराजे यांनी कोल्हापूर-पोलंडच्या ऐतिहासिक संबंधांना उजाळा दिला. इतिहासातील हे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांच्या माध्यमातून शैक्षणिक व सांस्कृतिक देवाणघेवाण करण्याबाबत, त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रांमध्ये व्यापार, उद्योग, गुंतवणूक व पर्यटन क्षेत्रांना चालना देण्याबाबत या बैठकीमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. संभाजीराजे यांनी प्रधानमंत्री टस्क यांना कोल्हापूर येथे पोलंडमधील उद्योगांचे औद्योगिक हब उभारण्याबाबत आवाहन केले.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडमधून विस्थापित झालेल्या नागरिकांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने दिलेल्या आश्रयाच्या ऐतिहासिक घटनेबद्दल पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी विशेष आस्था व्यक्त केली. मानवता, सहिष्णुता आणि सेवाभाव या मूल्यांचे जतन करणाऱ्या कोल्हापूकरांबद्दल प्रशंसोद्‌गार काढले. भेटीदरम्यान पोलंडच्या पंतप्रधान कार्यालयाचे प्रतिनिधी आणि भारतातील पोलंडचे राजदूत, पोलंडमधील भारताचे राजदूत आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news