Shahapur Gambling Den | शहापुरात जुगार अड्ड्यावर छापा

११ जण ताब्यात; ४ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त
Shahapur Gambling Den |
Shahapur Gambling Den | शहापुरात जुगार अड्ड्यावर छापा
Published on: 
Updated on: 

यड्राव : शहापूर येथील दत्तनगर परिसरात जुगार अड्ड्यावर शहापूर पोलिसांनी छापा टाकून ११ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रकमेसह ११ मोबाईल, तीन मोटारसायकली, डीव्हीआर आणि जुगाराचे साहित्य असा चार लाख ६३ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबतची फिर्याद पो. कॉ. अमोल शिंदे यांनी दिली आहे. बुधवारी रात्री ९.४५च्या सुमारास हा छापा टाकला.

यावेळी रणजित कृष्णात कुबडे (३६) याच्या खोलीत अथर्व कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ या नावाने नोंदणीकृत असलेल्या क्लबमध्ये रणजित कुबडे याच्यासह शंकर दिलीप प्रभावळ (३१), संदीप मालबा ढवळे (३८), रवींद्र रमेश दंडगे (३१), महादेव रमेश पोळ (३६), शुभम भरत माळी (२६, सर्व दत्तनगर शहापूर), सूरज बाळकृष्ण साळोखे (३१), स्वप्निल अनिल जंत्रे (२९, रा. जवाहरनगर इचलकरंजी), राजू बसाप्पा खोत (३२), सोमनाथ विजय वाघमारे (४०, रा. गणेशनगर शहापूर), अवधूत वसंत कोरवी (३२, रा. डेक्कन बाजारजवळ इचलकरंजी) हे ११ जण जुगार खेळताना आढळून आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार, उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर, सहायक फौजदार अविनाश मुंगसे, नीलेश पाटील, अरविंद माने, रोहित डावाळे, सतीश कुंभार यांनी केली.