

कसबा बावडा : कसबा बावडा येथील गोळीबार मैदान परिसरात नेजदार यांच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा छापा टाकून 48 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी 15 लाख 94 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एकूण 49 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगार खेळणार्यांना मंगळवारी रात्री ताब्यात घेतले होेते; तर बुधवारी समज देऊन त्यांना सोडण्यात आले.
पोलिस कॉन्स्टेबल राहुल यशवंत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई मंगळवारी रात्री उशिरा पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या पथकाने ही कारवाई केली. फिर्यादींच्या माहितीनुसार नेजदार यांच्या मालकीच्या शेडमध्ये सहा-सहा जणांचे गट तयार करून तीन पानी पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळला जात होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तत्काळ कारवाई करत सर्व जुगार्यांना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे अशी : अनिल गंगाराम गवळी, पिरप्पा यलबसप्पा साबळे, सचिन रघुनाथ चव्हाण, अभिषेक अरविंद बावडेकर, रोहित आदिनाथ चौगुले, अक्षय उद्देश पाटील, अमित रामचंद्र काळे, आनंदा शामराव पाटील, शुभम वसंत साठे, मच्छिंद्र रामचंद्र कारंडे, राहुल जयसिंग आमते, तुकाराम भाऊसो पाटील, सचिन राजू माने, सुनील श्रीपती इंदुलकर, स्वप्नील विलास चौधरी, ओमकार प्रताप उलपे, शकील यासीन मोमीन, संजय शंकर शिंदे, इम—ान कलंदर इनामदार, पुष्कराज कमलाकर नेजदार, विराज विलास कोळी, सुरेश गोविंद पाटोळे, शुभम सुरेश ठोंबरे, प्रवीण विलास बागडी, दत्तात्रय शंकरराव नेजदार, प्रसाद रंगराव गुरव, मनोहर बाबूराव नेजदार, विरेशा विजय बडीगरे, सुरज प्रकाश रसाळ, ताहिर सरदार हवालदार, पंडित यशवंत दाभोळे, शशीद राजाराम पाटील, श्रीकांत प्रभाकर चव्हाण, सिकंदर रजाक इनामदार, रमेश गोविंद पाटोळे, दीपक श्रीपती चौगुले, आनंदा चंदर नेजदार, किरण भगवान बागडी, निखिल संजय पोवार, जगदीश विष्णू ठोंबरे, प्रणव संग्राम हिलगे, अनिकेत आनंदा अस्वले, रोहन मोहन खाडे, अर्जुन प्रभाकर गाडे, नीलेश अशोक अपराध, अक्षय सुनील शिंदे (सर्व रा. कसबा बावडा, कोल्हापूर), अमित विठ्ठल सूर्यवंशी (शुक्रवार पेठ, कोल्हापूर), चंद्रकांत धोंडीराम शिंदे (रा. भारत उद्योग, शिरोली एमआयडीसी). या कारवाईत रोख रक्कम 46,250 रु., 33 मोबाईल हँडसेट : किंमत 5 लाख 5000 रु., 17 मोटरसायकली किंमत अंदाजे 10,43,000 रु., पत्त्यांचे 8 संच असा एकूण 15,94,250 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयितांमध्ये कोल्हापूर शहर व परिसरातील विविध भागांतील नागरिकांचा समावेश आहे.