Gambling raid | विचारेमाळ येथे जुगार अड्ड्यावर छापा; मालकासह 11 जणांना अटक

 (छाया : नाज ट्रेनर)
कोल्हापूर : पोलिसांनी मालकासह 11 जणांना अटक केली.
Published on
Updated on

कोल्हापूर : सदर बाजार परिसरातील विचारे माळ, शीख गल्ली येथील तीन पानी जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून अड्डामालकासह 11 जणांना अटक केली. जुगार्‍यांकडून 61 हजाराची रोकड, मोबाईल असा एक लाख 45 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शनिवारी पहाटे छापा टाकून पथकाने कारवाई केली.

अड्डामालक उमर ऊर्फ बंडा अय्याज फकीर (32, रा. शीख गल्ली, विचारेमाळ), नियाज दावन इनामदार (36. साळुंखेनगर, सदर बाजार), सागर मारुती कागले (29, सदर बाजार, कोल्हापूर), पोपट वसंत हेगडे (42, कसबा बावडा), अमित दिलीप वडणकर (45, लोणार वसाहत, शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर), महेश रामचंद्र लोखंडे (45, गडमुडशिंगी), मुनाफ आयुब बागवान (27, बिंदू चौक) मंगेश चंद्रकांत पाटील (38, राजारामपुरी, दुसरी गल्ली), संदीप मारुती वायदंडे (39, कनाननगर) राजेंद्र सदाशिव निकम (64, शिवाजी पेठ), सोहेल अस्लम शेख (23, राजारामपुरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

विचारेमाळ, शीख गल्ली येथील उमर ऊर्फ बंडा अय्याज फकीर याच्या भाड्याच्या खोलीत तीन पानी जुगार अड्डा चालविला जात असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संतोष डोके, उपनिरीक्षक आकाश जाधव यांच्या पथकाने पहाटेच्या सुमारास छापा टाकून कारवाई केल्याने जुगार्‍यांची तारांबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news