Bogus Workers | बोगस कामगारांच्या कागदपत्रांची पोलिसांकडून तपासणी
कोल्हापूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे राज्य शासनालाच तब्बल 45 लाखाला गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. आता बनावट प्रमाणपत्रे सादर करून बोगस कामगार बनलेल्यांच्या कागदपत्रांची पोलिसांकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर एकेका प्रकरणाचा तपास केला जाणार आहे.
विशेष म्हणजे, दोन महिलांनी पतीच्या मृत्यूचे बनावट प्रमाणपत्र जोडलेले आहे. 25 आरोपींनी शासनाच्या विविध योजनांचा आर्थिक लाभ उठविण्यासाठी खोटी मृत्यू प्रमाणपत्रे, दिव्यांग प्रमाणपत्रे, 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केल्याबाबतचे ठेकेदाराचे खोटे प्रमाणपत्र सादर करून फसवणूक केली आहे. याप्रकरणी सहायक कामगार आयुक्त (सांगली) कार्यालयातील रोहित गोरे यांनी संबंधितांविरुद्ध फिर्याद दिली आहे. मार्च 2022 ते जुलै 2025 या कालावधीत व्यापारी पेठ, शाहूपुरी, कोल्हापूर येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयात फसवणुकीची ही घटना घडली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

