Suraj Sakhare Firing | साखरेवरील गोळीबारासाठी उत्तर प्रदेशमधून पिस्तूल आणले

जयसिंगपूर येथील प्लायवूड विक्रेत्यासह परप्रांतीय कामगारास अटक; अन्य एकाचा शोध सुरू
Suraj Sakhare Firing |
Suraj Sakhare Firing | साखरेवरील गोळीबारासाठी उत्तर प्रदेशमधून पिस्तूल आणले
Published on
Updated on

कोल्हापूर : सूरज साखरेचा गेम करण्यासाठी उत्तर प्रदेशातून पिस्तूल आणल्याची माहिती बुधवारी तपासात समोर आली. साखरेची सुपारी घेणाऱ्या राकेश कारंडेला पिस्तूल पुरविणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मंगळवारी रात्री जयसिंगपूर येथून अटक केली. त्यांच्या चौकशीतून ही माहिती समोर आली.

प्लायवूड विक्रेता यश अनिल खैरे (वय ३४, रा. धरणगुत्ती, ता. शिरोळ), सुतार कामगार दीपक विश्वकर्मा (वय ३७, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. जयसिंगपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. २७) पोलीस कोठडी सुनावली. राकेश कारंडे आणि यश खैरे यांच्यात पिस्तूलचा व्यवहार घडवून आणणाऱ्या सतीश पोवार (रा. जयसिंगपूर) याचा शोध सुरू आहे. यशने दीपकला पिस्तूल खरेदीसाठी उत्तर प्रदेशला पाठविले. त्याला ऑनलाईन २० हजार दिले. दीपकने ६० हजारांना पिस्तूल खरेदी करून ते यशला दिले. त्याने ८० हजारांना सतीशला दिले असून सतीशने १ लाखास कारंडेला विकले. अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण करत आहेत.

जुलैच्या पहिल्याच आठवड्यात आणले पिस्तूल

दीपकने जुलैच्या पहिल्याच आठवड्यात उत्तर प्रदेश येथून ट्रेनमधून पिस्तूल आणून यशच्या ताब्यात दिले. दोन दिवस आपल्याकडे ठेवून यशने ६ जुलै रोजी ते सतीशकडे दिले. सतीशने ९ तारखेला कारंडेकडे पिस्तूल व राऊंड दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news