फुले, शाहूंच्या विचारांचा वसा मराठा सेवा संघाने जोपासला : संजयसिंह चव्हाण

फुले, शाहूंच्या विचारांचा वसा मराठा सेवा संघाने जोपासला : संजयसिंह चव्हाण

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा: मराठा समाज हा बहुजन समाज आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचा वसा आणि वारसा शाहू महाराजांनी जोपासला आणि तो मराठा सेवा संघ जोपासत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. येथील जैन सांस्कृतिक भवन येथे आज (दि.११) मराठा सेवा संघाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, विक्रीकर सहायक आयुक्त समरजीत थोरात, माजी नगराध्यक्ष जयराम पाटील आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, छत्रपती, गौतम बुद्ध, तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण म्हणाले की, मराठा समाजात सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा कष्टाळूपणाआहे. अप्पर जिल्हाधिकारी पवार म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात मराठा समाज हा खूप मोठा आहे. मात्र राज्यातील साडेतीन हजार महाविद्याल्यात २ लाख १५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. समाजात गरिबी असल्याने नोकरी मिळणार नाही, म्हणून शिकून काय करायचं, असा न्यूनगंड तयार झाला आहे. मुलांनी इतर शिक्षणातून पदवी प्राप्त करत व्यवसायातून प्रगती होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तो न्यूनगंड दूर करावा आणि शिक्षणावर भर द्यावी, असे सांगितले.

स्वागत व प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष महिपती बाबर यांनी केले. कोल्हापूर जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, स्नेहा खेडेकर आदींनी मनोगते व्यक्त केली. संघटनात्मक बांधणी, महिला सक्षमीकरणाचे प्रभावी माध्यम, महामानवांचे विचार या विषयावर सायंकाळपर्यंत व्याख्यान होणार आहेत. यावेळी सांगलीचे तहसीलदार उदयसिंह गायकवाड, अरुण आलासे, आर. आर. पाटील, उदय डांगे, अनुप मधाळे, कृष्णा नरके, सचिन मोहिते, नंदकुमार पाटील आदीसह समाजबांधव उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news