

हातकणंगले : आळते (ता. हातकणंगले) येथे अवैधरित्या खासगी सावकारी करून औषध विक्रेत्याकडून जवळपास 24 लाख रुपयांची वसुली करणार्या तिघा खासगी सावकारांवर हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विजय आप्पासो चव्हाण (वय 39), विष्णू आण्णासो जाधव (45), संतोष बाळू रोहिले ( 42, तिघे रा. आळते) नावे असून त्यांना अटक केली आहे.
आळते येथे उत्तम तानाजी पाटील (वय 49, रा. गणेश मंदिराजवळ मुडशिंगी) यांचे औषध विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या वैयक्तीक कामासाठी त्यांनी आळते येथील विजय चव्हाण, विष्णू जाधव व संतोष रोहिले यांच्याकडून दरमहा 3 टक्के दराने टप्प्याटप्प्याने 7 लाख रुपये घेतले होते; मात्र उत्तम पाटील यांनी आजतागायत घेतलेले कर्ज व त्याच्या व्याजाची रक्कम 24 लाख रुपये भागवूनही संशयीत सावकारांनी पाटील यांच्याकडे आणखी रकमेसाठी तगादा लावला.
त्यातूनच त्यांना मानसिक त्रास दिला जात होता. त्यामुळे पाटील यांनी त्यांच्या विरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास अधिक तपास पो. नि. शरद मेमाणे करत आहेत.