Peth Vadgaon Missing Youth | पेठवडगाव येथील युवक १४ दिवसांपासून पुण्यातून बेपत्ता

पुण्‍याच्य‍ा मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी
Peth Vadgaon Missing Youth |
Peth Vadgaon Missing Youth | पेठवडगाव येथील युवक १४ दिवसांपासून पुण्यातून बेपत्ता
Published on
Updated on

पेठवडगाव : पुण्यातील एका मेडिकल कॉलेजमधील प्रथम वर्ष ‘एमबीबीएस’चा विद्यार्थी तन्मय अजयकुमार वंगे (वय १९, रा. पेठवडगाव) हा १४ दिवसांपासून बेपत्ता आहे. याची नोंद पुण्याच्या खराडी पोलिस ठाण्यात केली आहे. रॅगिंग आणि मानसिक छळामुळे बेपत्ता झाल्‍याचा आरोप नातेवाईकांनी केल्‍याने खळबळ उडाली आहे.

तन्मयच्या वडिलांनी केलेल्या आरोपानुसार, कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांकडून त्याचा सातत्याने मानसिक छळ हाेत होता. ग्रामीण भागातून आल्याचा उल्लेख करून त्याला कमी लेखणे, अपमानास्पद टिपणी करणे, अयोग्य आणि जाचक स्वरूपाचे ‘टास्क’ करण्यास भाग पाडले जात होते. अभ्यासासाठी घेतलेल्या मदतीचाही गैरफायदा घेत त्याच्यावर मानसिक दबाव टाकण्यात येत हाेता. परीक्षा संपल्यानंतर कॉलेज प्रशासनाकडे अधिकृत तक्रार करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला होता. मात्र, मानसिक तणाव असह्य झाल्याने १८ जुलै रोजी संध्याकाळी तन्मय मित्राला ‘काकांकडे जातो’ असे सांगून होस्टेलमधून बाहेर पडला. त्यानंतर तो परतलाच नाही.

पोलिस तपासात तन्मय पुणे रेल्वेस्थानकावरून हुतात्मा एक्‍स्‍प्रेसने सोलापूरच्या दिशेने गेल्याचे निष्पन्‍न झाले. लोणीकंद परिसरात त्याचे मोबाईलचे शेवटचे लोकेशन मिळाले असून, त्यानंतर मोबाईल बंद आहे. कॉलेजकडून तत्काळ चौकशी सुरू झाली नाही, अँटी रॅगिंग समितीच्या चौकशीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसल्याचा दावा पालकांंनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news