Pawankhind Dipostav : शौर्यभूमी पावनखिंड शेकडो पणत्यांनी उजळली!

स्वराज्य प्रतिष्ठानचा ऐतिहासिक भूमीला दीपोत्सवातून मानाचा मुजरा; ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
Pawankhind Dipostav : शौर्यभूमी पावनखिंड शेकडो पणत्यांनी उजळली!
Pawankhind Dipostav : शौर्यभूमी पावनखिंड शेकडो पणत्यांनी उजळली!
Published on: 
Updated on: 

विशाळगड : शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय पराक्रमाने पावन झालेली ऐतिहासिक पावनखिंड शुक्रवारी शेकडो पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघाली. शाहुवाडी येथील स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दीपोत्सवाने ऐतिहासिक शौर्यभूमीला अनोखी मानवंदना देण्यात आली. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. झुंजार माने यांच्या हस्ते स्मृतिस्थळाचे पूजन करून दीपोत्सवाचा प्रारंभ झाला. स्मृतिस्थळासह पायरी मार्गावर प्रज्वलित केलेल्या पणत्यांनी संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला.

यावेळी बोलताना डॉ. माने म्हणाले, ज्या गड-किल्ल्यांमुळे आणि ऐतिहासिक भूमीमुळे आपण आज आनंदाने दिवाळी साजरी करतो, त्याच ऐतिहासिक वास्तू सणासुदीच्या काळात अंधारात असतात. या शौर्यभूमींचे स्मरण, संवर्धन आणि जतन करण्याची जबाबदारी प्रत्येक शिवप्रेमीने स्वीकारली पाहिजे. नव्या पिढीपर्यंत इतिहासाचे महत्त्व पोहोचविण्यासाठी प्रतिष्ठान प्रयत्नशील आहे. यावेळी डॉ. झुंजार माने, सचिन चौगुले, प्रकाश काळे, हैबती सोने, भानुदास शिसाळ यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.