Chandrakant Cup football final | चंद्रकांत चषक पाटाकडीलने पटकाविला

खंडोबावर एकमेव गोलने मात; अमिन खजीरचा विजयी गोल
कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळ आयोजित चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचा विजेता पाटाकडील तालीम मंडळाला चषक देवून गौरविताना मान्यवर. सोबत संयोजक, खेळाडू. अंतिम  सामना पाहाण्यासाठी झालेली फुटबॉलप्रेमींची गर्दी.
कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळ आयोजित चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचा विजेता पाटाकडील तालीम मंडळाला चषक देवून गौरविताना मान्यवर. सोबत संयोजक, खेळाडू. अंतिम सामना पाहाण्यासाठी झालेली फुटबॉलप्रेमींची गर्दी. (छाया : पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : अटीतटीच्या सामन्यात बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळाला शर्थीची झुंज देत खंडोबा तालीम मंडळाने मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत राखला. मात्र उत्तरार्धात गोलरक्षकाच्या चुकीमुळे झालेल्या गोलच्या जोरावर सामना पाटाकडीलने 1-0 असा जिंकत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. विजयी गोलची नोंद अमिन खजीर याने केली.

फुटबॉलप्रेमी आमदार कै. चंद्रकांत जाधव यांच्या स्मरणार्थ बालगोपाल तालीम मंडळ व जाधव इंडस्ट्रीज यांच्या वतीने ‘चंद्रकांत चषक 2026 ’ वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेचे आयोजन छत्रपती शाहू स्टेडियमवर करण्यात आले होते. रविवारी हजारो फुटबॉलप्रेमींच्या उपस्थितीत खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ यांच्यात अंतिम सामना रंगला. सामन्याच्या उत्तरार्धात पाटाकडीलकडून झालेल्या चढाईत पुढे आलेल्या खंडोबाचा गोलरक्षक आकाश मेस्त्री याला चकवा देत अमिन खजीर याने गोल नोंदवून संघाला 1-0 असा विजय मिळवून दिला.

बहारदार बक्षीस समारंभ

स्पर्धेचा बक्षीस समारंभ माजी आमदार जयश्री जाधव, माजी नगरसेवक सत्यजित कदम, शिवसेना गटनेता शारंगधर देशमुख, मनपाचे परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, भाजपचे युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, पुष्कराज क्षीरसागर, केएसएचे सचिव माणिक मंडलिक, जयेश ओसवाल, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, रत्नेश शिरोळकर, अश्पाक आजरेकर, वैभव माने, ओंकार जाधव, इस्माईल बागवान यांच्या हस्ते झाले. संयोजन अध्यक्ष राजेंद्र कुरणे, निवास शिंदे, राहुल चव्हाण, आप्पा साळोखे, युवराज कुरणे व सहकार्‍यांनी केले. निवेदक म्हणून विजय साळोखे यांनी काम पाहिले.

बक्षिसांचा वर्षाव...

विजेता : पाटाकडील तालीम : 2 लाख 31 हजार रुपये व चंद्रकांत चषक

उपविजेता : खंडोबा तालीम मंडळ : 1 लाख 31 हजार रुपये व चषक

उपांत्य फेरीतील पराभूत : दिलबहार व बालगोपाल तालीम प्रत्येकी 31 हजार रुपये

मालिकावीर : अमिन खजीर (पीटीएम) 31 हजार रुपये ट्रॉफी

उत्कृष्ट गोलकीपर : अमर गवळी (पीटीएम) 11 हजार व ट्रॉफी

उत्कृष्ट डिफेन्स : अक्षय पायमल (पीटीएम) 11 हजार व ट्रॉफी

उत्कृष्ट हाफ : प्रभू पोवार (खंडोबा) 11 हजार व ट्रॉफी

उत्कृष्ट फॉरवर्ड : विष्णू टी.एम. (खंडोबा) 11 हजार व ट्रॉफी

सामनावीर : ओंकार मोरे (पाटाकडील) 3100 रुपये व ट्रॉफी.

प्रत्येक सामन्यातील सामनावीरास 3100 रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news