Navratri festival | नवरात्रौत्सव काळात ७० हजार भाविकांसाठी पार्किंग सुविधा

शहर वाहतूक शाखेच्या वतीने तयारी सुरू; २३०० चारचाकींसह दुचाकींची व्यवस्था
Navratri festival |
Navratri festival | नवरात्रौत्सव काळात ७० हजार भाविकांसाठी पार्किंग सुविधा
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सव काळात देशभरातून दररोज लाखो भाविक करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येतात. या काळात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने ७० हजार भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये २३३० चारचाकी, मिनी बस व लक्झरी तसेच २३५० दुचाकीसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

शारदीय नवरात्रौत्सव अवघ्या आठ दिवसांवर आला आहे. यामुळे प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पार्किंग व्यवस्थेवर भर दिला आहे. सुमारे ५ हजार वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून, या ठिकाणांची डागडुजी आणी सफाई हाती घेतली आहे. लाईटची व्यवस्थाही करण्यात येत आहे. मोबाईल टॉयलेटची सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे.

दिशादर्शक ॲपचा होणार वापर

परजिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांना पार्किंगपर्यंत पोहोचणे सोयीचे व्हावे , यासाठी २२ ठिकाणी दिशादर्शक फलक लावले आहेत. तसेच नवरात्रौत्सवामध्ये ॲपद्वारे पार्किंगची माहिती भाविकांच्या मोबाईलवर देण्याचीही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. याचे स्कॅनर शहरात ठिकठिकाणी लावले जाणार आहेत.

१०० बेवारस वाहने हटविली

पार्किंग व्यवस्थेसोबतच अतिक्रमण, बेवारस वाहनांविरोधातही शहर वाहतूक शाखेने मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत शहरातील प्रमुख मार्गांवरील १०० हून अधिक बेवारस वाहने हटविली आहेत. तसेच अजून १०० वाहन मालकांना नोटीस बजावल्या आहेत.

पार्किंग ठिकाणे अशी-

आराम बसेस - निर्माण चौक, व्हीनस कॉर्नर गाडी अड्डा, खानविलकर पंप १०० फुटी रस्ता, शाहू दयानंद हायस्कूल, पंचगंगा घाट, तपोवन मैदान, एस्तेर पॅटर्न स्कूल

चारचाकी - बिंदू चौक, मेन राजाराम हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, सुसूर बाग, पेटाळा मैदान, आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल, शाहू स्टेडियम, गांधी मैदान

मोटारसायकल - एम.एल.जी. हायस्कूल मैदान, सरस्वती चित्रमंदिर पार्किंग, भाऊसिंगजी रोड, शिवाजी रोड, मिरजकर तिकटी परिसर, गुजरी परिसर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news