

कोल्हापूर : लग्नाच्या धामधुमीत घरात बेडरूममधील कपाटातून 3 लाख 60 हजार रुपये किमतीचे साडेचार तोळ्याचे दागिने अनोळखी चोरट्याने लंपास केले. दि. 2 ते 6 डिसेंबर काळात परिते (ता. करवीर) येथे ही घटना घडली. सविता विजय ताडे (वय 23, रा. मेन रोड, पेट्रोल पंपाजवळ) यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
चोरट्याने कपाटातील 13 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, 20 ग्रॅमचे सोन्याचे गठंण, 6 ग्रॅमचे कानातील टॉप्स लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सविता ताडे यांचे दीर स्वप्निल यांच्या लग्नानिमित्ताने घरात धामधूम सुरू होती. लग्न झाल्यानंतर पूजेसाठी कपाट उघडले असता, त्यामध्ये दागिने नसल्याचे निदर्शनास आले. शोधाशोध करूनही दागिने आढळून आले नाहीत. याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे