Panchganga Crematorium Case | पंचगंगा स्मशानभूमीत अर्धवट जळालेला मृतदेह?

Panchganga Crematorium Case |
Panchganga Crematorium Case | पंचगंगा स्मशानभूमीत अर्धवट जळालेला मृतदेह?
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पंचगंगा स्मशानभूमीत अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा व्हिडीओ सोमवारी (दि. १५) व्हायरल झाला. सरणावर असलेल्या मृतदेहाचे पाय, चेहरा अर्धवट जळत असून, त्यावर शेणी टाकण्यात आल्या होत्या आणि अंत्यसंस्कार सुरू होते. त्यासंदर्भात चौकशी केली असता संबंधित घटना पंचगंगा स्मशानभूमीत सोमवारी दुपारी घडल्याचे स्पष्ट झाले.

राखेत अवयव दिसला असता, तर अर्धवट अंत्यसंस्कार

दरम्यान, याविषयी महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांनी सांगितले की, सरणावरील लाकडावर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ठेवला जातो. त्यावर शेणी रचण्यात येतात. सरण पेट घेईल तसे शेणी खाली पडतात. त्यामुळे मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी दोन-तीनवेळा शेणी टाकाव्या लागतात. व्हायरल व्हिडीओमध्ये मृतदेहावर शेणी दिसत आहेत. कुणीतरी खोडसाळपणे हा व्हिडीओ करून व्हायरल केला आहे. अंत्यसंस्कार पूर्ण होऊन राखेत मृतदेहाचा अवयव दिसला असता, तर अर्धवट अंत्यसंस्कार म्हणता आले असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news