Panchganga pollution protest | पंचगंगा प्रदूषणविरोधात ग्रामस्थांचा एल्गार

शिरोळ, कुरुंदवाड, नांदणी, नृसिंहवाडी, लाटसह 11 गावांत कडकडीत बंद
(छाया : सुभाष गुरव)
शिरोळ : पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी पुकारलेल्या बंदमुळे अशा प्रकारे शहरात शुकशुकाट पसरला होता.
Published on
Updated on

जयसिंगपूर/शिरोळ/नृसिंहवाडी/शिरढोण/अब्दुललाट : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी आंदोलन अंकुशने पुकारलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शिरोळकरांनी शुक्रवारी दिवसभर शिरोळ तालुक्यातील शिरोळ, कुरुंदवाड शहरासह नांदणी, अब्दुललाट, शिरढोण, टाकवडे, हेरवाड, तेरवाड, धरणगुत्ती, शिरदवाड, नृसिंहवाडी या गावांत बाजारपेठांसह कडकडीत बंद पाळून पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त झालीच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. गावागावांतून रॅली काढण्यात आल्या. इचलकरंजी येथील काळ्या ओढ्यावर या रॅलीने धडक दिली.

धनाजी चुडमुंगे यांनी बंद असलेल्या गावांना भेटी दिल्या. शिरोळ येथे उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिरोळकरांनी शुक्रवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार, दुकाने, व्यवसाय, उद्योग बंद ठेवले. शहर बंद असल्यामुळे सकाळपासूनच शहरातील मुख्य चौकात शुकशुकाट जाणवत होता. नृसिंहवाडीत मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व मेवा-मिठाई, हॉटेल व इतर व्यापार्‍यांनी दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवली होती. माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, प्रतीक धनवडे उपस्थित होते.

कुरुंदवाडमध्येही नागरिकांनी उत्स्फूर्त बंद पाळला. शिरढोण, टाकवडे, नांदणी, धरणगुत्ती, अब्दुललाट, शिरदवाड या ठिकाणीही बाजारपेठा बंद ठेवून व्यावसायिकांनी पंचगंगा नदी प्रदूषणाला विरोध दर्शविला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news