Panchaganga River | पंचगंगा बचावासाठी कुरुंदवाड कडकडीत बंद ; निषेध रॅली टाकवडेकडे रवाना

विविध ठिकाणी घोषणाबाजी करत पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला
panchganga river pollution
panchganga river pollution
Published on
Updated on

कुरुंदवाड : पंचगंगा नदीच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनाला कुरुंदवाड शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून व्यापारी, नागरिक तसेच विविध संघटनांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत पंचगंगा बचावासाठी एकजूट दर्शविली.

panchganga river pollution
Panchaganga River | पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी निर्णायक लढ्याची गरज

सकाळपासूनच बाजारपेठेतील दुकाने आणि व्यावसायिक आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या. रस्त्यांवर नेहमीची वर्दळ कमी दिसून येत होती. नागरिकांनी स्वखुशीने बंदला पाठिंबा देत निषेध रॅलीत सहभाग घेतला. विविध ठिकाणी घोषणाबाजी करत पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला.

panchganga river pollution
Panchganga river pollution | पंचगंगेत रोज 200 एमएलडी सांडपाण्याचा लोंढा

या आंदोलनात युवक, व्यापारी, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पंचगंगा नदी ही शहराची जीवनवाहिनी असून तिचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असा सूर आंदोलनातून उमटला. प्रदूषण करणाऱ्या घटकांवर तात्काळ व कायमस्वरूपी कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.शहरातील सर्वच स्तरांतून मिळालेल्या या पाठिंब्यामुळे आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. कुरुंदवाडकरांनी एकदिलाने उभे राहत पर्यावरण संरक्षणाचा ठाम संदेश प्रशासनापर्यंत पोहोचविला. शहरातून निषेध रॅली काढून हि रॅली टाकवडे येथील काळ्या ओढ्याकडे आंदोलनाच्या दिशेने रवाना झाली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news