पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव चषक एस. एस. वॉरियर्सने पटकाविला

अंतिम सामन्यात एच. एम. फायटर्सवर 3 विकेटस्नी मात
Kolhapur News
कोल्हापूर : परिवहन कल्चर व स्पोर्टर्स फाऊंडेशन संलग्न शांद फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव चषक कोल्हापूर टी-20 क्रिकेट लीग’ स्पर्धेतील विजेता एस. एस. वॉरियर्स संघाला गौरविताना आ. राजेश क्षीरसागर, अनुराग निखारे, एस. आर. पाटील, आनंद माने, अरुण सोनवणे, लहूकुमार थोरात, अमित माने, बळीराम वराडे, अभिजित गायकवाड आदी.
Published on
Updated on

कोल्हापूर : चुरशीच्या अंतिम सामन्यात एच. एम. फायटर्स संघाचा 3 विकेटस्नी पराभव करून एस. एस. वॉरियर्स संघाने ‘पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव चषक कोल्हापूर टी-20 क्रिकेट लीग’ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. परिवहन कल्चर व स्पोर्टस् फाऊंडेशन संलग्न शांद फाऊंडेशनतर्फे आयोजित स्पर्धेचा अंतिम सामना शास्त्रीनगर मैदानावर रंगला होता.

अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत एच. एम. फायटर्स संघाने 10 बाद 110 धावा केल्या. यात चेतन नार्वेकरने 31, अनुराग मेस्त्रीने 27 धावा केल्या. एस. एस. वॉरियर्स संघाच्या विकास जाधवने 4 तर अभिजित लोखंडेने 2 विकेटस् घेतल्या. उत्तरादाखल एस. एस. वॉरियर्सने 7 विकेटस् गमावून 111 धावांसह विजय साजरा केला. त्यांच्या रणजित निकमने 36, शुभम वाडकरने 12 धावा केल्या. एच. एम. फायटर्सच्या शिवराज जगतापने 3, शरद पाटीलने 2 विकेटस् घेतल्या.

शास्त्रीनगर मैदानाला निधी : आ. क्षीरसागर

स्पर्धेचा बक्षीस समारंभ राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाला. त्यांनी कोल्हापुरातील क्रिकेटच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याबरोबरच शास्त्रीनगर मैदानावर सोयी-सुविधांकरिता आवश्यक निधी उपलब्ध करण्याची ग्वाही दिली. त्यांच्या हस्ते ज्येष्ठ क्रीडापटू रघुनाथ पिसे व सुरेश वारंगे यांचा विशेष सन्मान मानपत्र देऊन करण्यात आला.

यावेळी कोल्हापूर पोस्टल डिव्हीजनचे एसएसपीओ अनुराग निखारे, गोकुळ दूध संघाचे संचालक एस. आर. पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, उद्योजक अरुण सोनवणे, चाटे शिक्षण समूहाचे लहूकुमार थोरात, हॉटेल भन्नाटवाडीचे अमित माने, ट्रेडविंगचे बळीराम वराडे, वरद डेव्हलपर्सचे अभिजित गायकवाड, नितीन पाटील, कॉम—ेड दिलीप पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लोटसचे निकितेश पाटील व महेश मस्के, एबी स्पोर्टस्चे अमर बागी, वैभव पाटील, शिवनेरी स्पोर्टस्चे महेंद्र चव्हाण व ओमकार मोहिते, माई सनराईजचे तेज घाटगे, डॉ. अभिजित कोराणे व क्षितीज पाटील, एच. एम. फायटर्सचे मेहबूब मुजावर व असिमपीर मुजावर, एस. एस. कम्युनिकेशनचे सनी शहा व रणजित निकम, सरस्वती इलेव्हनचे शंकर दुल्हाणी, रोहित पाटील, यश टायगर्सचे आदित्य जाधव व शुभम माने उपस्थित होते.

शांद फाऊंडेशनचे अध्यक्ष रणजित इंदुलकर यांनी सर्वांचे स्वागत केले. संयोजन मधू बामणे, योगेश सूर्यवंशी, विक्रम जाधव, प्रकाश माजगावकर, प्रसाद मिराशी, काका पाटील, प्रभाकर यादव, राजाराम कुलकर्णी, अनिल शिंदे व सहकारी यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news