Ambabai temple | पर्यटकांनी बहरले कोल्हापूर; अंबाबाई दर्शनासाठी तीन लाखांवर भाविकांची उपस्थिती

कोल्हापूर : अंबाबाईच्या दर्शनासाठी झालेली भाविकांची अलोट गर्दी.
कोल्हापूर : अंबाबाईच्या दर्शनासाठी झालेली भाविकांची अलोट गर्दी. (छाया : नाज ट्रेनर)
Published on
Updated on

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मुख्य दर्शनाबरोबर मुखदर्शनासाठीही तब्बल दोन तासांचा वेळ, भवानी मंडप कमानीपर्यंत पोहोचलेली रांग, न्यू पॅलेस म्युझियसमोर अर्धा किलोमीटर रांगेत उभारलेले पर्यटक, रंकाळ्यावरील बाग आणि नौकाविहाराला मिळालेला प्रतिसाद अशा अपूर्व उत्साहात रविवारी कोल्हापूरच्या पर्यटनाला बहर आला.

उन्हाळी सुट्टीची पर्वणी साधत कोल्हापूरच्या भटकंतीसाठी आलेल्या पर्यटकांच्या गर्दीने रविवार गजबजून गेला. दिवसभरात तीन लाख भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्याची नोंद झाली. सध्या अधिक मास आणि उन्हाळी सुट्टी सुरू असल्यामुळे राज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक व भाविक कोल्हापुरात येत आहेत. दर शनिवारी व रविवारी तर पर्यटकांची गर्दी असतेच पण अधिक मास सुरू झाल्यापासून रोज सरासरी एक लाख भाविक अंबाबाईचे दर्शन घेतात. अंबाबाई मंदिर, टाऊन हॉल, न्यू पॅलेस, रंकाळा यासह जोतिबा, पन्हाळा, कणेरीमठ, सातेरी डोंगर, नृसिंहवाडी, गगनबावडा, राधानगरी येथील स्थळांना पर्यटकांनी पसंती दिल्याने दिवसभर गर्दीचा ओघ सुरू होता.

काही मार्गांवर वाहतूक कोंडी

शहरातील होमस्टे, यात्री निवास, छोटी-मोठी हॉटेल्समध्ये बुकिंग फुल्ल होते. महापालिका, देवस्थान, वाहतूक शाखा यांच्या वाहन पार्किंग ठिकाणांपासून अनेक खासगी वाहन पार्किंग ठिकाणांवरही वाहने लावण्यासाठी पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागत होती. परिणामी, पर्यटन स्थळांच्या परिसरात जाणार्‍या काही मार्गांवर वाहतूक कोंडी होत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news