Ganja seizure news | उसाच्या शेतात गांजाची लागवड; बालेवाडीतील शेतकर्‍यावर गुन्हा

एक किलोहून अधिक गांजा जप्त; पोलिसांची संयुक्त कारवाई
Ganja seizure news |
Ganja seizure news | उसाच्या शेतात गांजाची लागवड; बालेवाडीतील शेतकर्‍यावर गुन्हाFile Photo
Published on
Updated on

साळवण : बालेवाडी (ता. गगनबावडा) येथील उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी एका शेतकर्‍यावर गगनबावडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गगनबावडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ही कारवाई केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बालेवाडी गावातील वड्याची खडी परिसरातील उसाच्या शेतामध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि. 13) सायंकाळी संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान अंदाजे एक किलो 290 ग्रॅम वजनाची हिरव्या रंगाची गांजाची रोपे, ओलसर पाने व देठ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 12 हजार 900 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी संशयित प्रकाश बाळू जाधव (39, रा. बालेवाडी, ता. गगनबावडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news